दिशा लाईव्ह न्यूज -:- भडगाव - पाचोरा रस्त्यावरील नीलमणी प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणाऱ्या गो संवर्धन केंद्राला भडगाव नगर परिषदेचे सफाई कर्मचारी यांनी एक ट्रॅक्टर मक्याचा चारा हा उपलब्ध करून दिला आहे.
हे गो संवर्धन केंद्र हे विनाअनुदानित असल्याने त्या ठिकाणी स्वखर्चाने चालविले जाते , बरीच शेतकरी मंडळी इथे गो -शाळेतील गायीसाठी चारा, ढेप आणि इतर जनावरांसाठी खाद्य घेऊन येत असतात. हाच आदर्श घेऊन येथील भडगाव नगर परिषदेचे सफाई कर्मचारी वाल्मिक पाटील, जगदीश मोरे, चैत्राम पवार,गोविंद देवरे, नाना चौधरी, दिनकर मोरे, कृष्णा वाघ आदींनी आपल्या शेतातील मक्याचा एक ट्रॅक्टर ट्रॉली हिरवा चारा दिला आहे.
यावेळी नीलमणी गो संवर्धन केंद्राचे व्यवस्थापक विनोद चौधरी यांनी चारा उपलब्ध करून दिल्याबद्दल वरील मान्यवरांचे आभार मानले आहे.

Post a Comment
0 Comments