प्रतिनिधी-:-पहूर ता जामनेर.
दिशा लाईव्ह न्यूज --:::---जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. 753F वर महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ. हेडगेवार प्राथमिक व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाजवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
याच पार्श्वभूमीवर पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष तथा आदर्श शिक्षक शंकर भामेरे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देत शाळेजवळ झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल यंत्रणा, सुचना फलक व गतिरोधक बसविण्याची मागणी केली.
ग्रामसभेने केला ठराव
पालक शिक्षक संघाच्या बैठकीतील ठरावा सोबतच पहूर कसबे ग्रामपंचायत सभागृहात सरपंच आशाताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत माजी सरपंच लक्ष्मण गोरे यांनी मांडलेल्या सूचनेनुसार एकमुखी ठराव करण्यात आला .
शाळेजवळ वाहनांचा स्पीड ताशी 65 किलोमीटर
खरंतर गावाजवळ आणि शाळेजवळ वाहनांचा नियंत्रित असणे आवश्यक आहे मात्र चक्क शाळेजवळ राष्ट्रीय महामार्गावर ताशी 65 किलोमीटर वेग असणारा फलक लावण्यात आलेला आहे .
या महामार्गावरून वाहतुकीचा मोठा वेगाने प्रवास होतो. त्यामुळे रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना मोठा धोका निर्माण होतो. अनेकदा अपघात टळल्याच्या घटना घडल्या आहेत. शाळेत लहान मुलांपासून ते माध्यमिक विद्यार्थ्यांपर्यंत मोठ्या संख्येने ये-जा होत असल्याने तातडीने सुरक्षेची उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे पालकांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागास आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment
0 Comments