दिशा लाईव्ह न्यूज-:- जामनेर तालुक्यातील मेणगाव येथे आज दि.30 सप्टेंबर रोजी चौधरी कुटुंबीय यांच्या गावशेजारी असंनाऱ्या शेतात आई तुळजाभवानी मंदिरावर सालाबादप्रमाणे या वर्षी ही अष्टमीला होम हवनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी गावातील भाविकांसह जामनेर, शेंदूर्णी,लोहारा, गारखेडा, पाचोरा, या सह अनेक गावातील भक्तगण उपस्थित होते.
यावेळी होम पूजेला जामनेर येथील सुप्रसिद्ध व्यापारी नवकार स्टीलचे मालक श्री प्रदीप शेठ पोरवाल हे सपत्नीक उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते आई तुळजाभवानी मातेची पूजा करण्यात आली. यावेळी त्यांनी कुमारी मुलींना कपडे(ड्रेस) देऊन सन्मानित केले.
तर आदरणीय प्रदीप शेटजी सह सपत्नीक त्यांचा सत्कार मेणगाव
येथील सुधाकर सोनजी चौधरी व अशोक सोनजी चौधरी यांनी केला.
सालाबादप्रमाणे या वर्षीही मंदिरावर केळी, साबुदाणा भाविकांसाठी ठेवण्यात आला होता.
एक जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ख्याती आहे.म्हणून दरवर्षी या मंदिरावर हजारो भक्तगण येतात, तर दसऱ्याच्या दिवशी शेंदूर्णी येथील शेकडो भाविकांची दिंडी येथे दर्शनासाठी येतात.
सदर मंदिराची देखभाल चौधरी कुटुंब बघत असत.



Post a Comment
0 Comments