Type Here to Get Search Results !

शेंदुर्णी एज्यु.संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सेवापूर्ती झालेल्या 14 कर्मचाऱ्यांचा सन्मान


दिशा लाईव्ह न्यूज --::-- धी.शेंदुर्णी एज्यु.को-ऑप सोसायटी च्या वतीने 24, 25 या शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा तसेच संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या वतीने महाविद्यालयाच्या प्रशस्त सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली. याप्रसंगी सभेचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड हे उपस्थित होते.



 त्यांच्यासमवेत व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शेळके सचिव काकासो.सागरमलजी जैन, सहसचिव दादासो यु.यु.पाटील, ज्येष्ठ संचालक आबासाहेब भीमराव पाटील,कार्यालयीन सचिव भाऊसो. दीपकजी गरुड,महिला संचालिका ताईसो उज्वला काशीद,संचालक राजेंद्रजी शेळके,संचालक विजय ज्ञानदेव गरुड,वस्तीगृह सचिव गो.गो सूर्यवंशी कर्मचारी प्रतिनिधी तथा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भोळे,उपप्राचार्य श्याम साळुंखे इत्यादी मान्यवर या सन्मान सोहळयाला व संस्थेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित होते.


याप्रसंगी प्राचार्य आर.एस.चौधरी यांनी प्रास्ताविक केले. तद्नंतर संस्थेचे कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड यांनी संस्थेचा लेखाजोखासह प्रोसिडिंगचे वाचन केले. व सभेतील बऱ्याचस्या विषयांना तत्वतः मान्यता देण्यात आली.

नंतर कर्मचारी सत्कार सोहळा सत्कारमूर्ती चतुर्थ श्रेणी कर्मचारी रामा झिपरु सोनवणे, प्रयोगशाळा परिचर रवींद्र खंडू भारुडे, वरिष्ठ लिपिक किशोर धांगो सोनवणे,मुख्याध्यापक अतुल बापूराव ठोके,उपशिक्षक प्रमोद जयवंतराव सोनवणे,मुख्याध्यापक नारायण गबरू नाईक,उपशिक्षक भगवान जगन्नाथ पाटील,वरिष्ठ लिपिक गुलशेर नबाब तडवी, उपशिक्षक अलेरखा रमजान तडवी,चतुर्थ श्रेणी कर्मचारी समाधान जानकीराम गुजर,वरिष्ठ लिपिक विजय हरी गरुड, मुख्याध्यापक अनिल रतन राव पाटील, उप मुख्याध्यापक/उप प्राचार्य विलास दयाराम पाटील,पर्यवेक्षक धनंजय मुरलीधर गरुड इत्यादी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या दिमाखाने पार पडला



 सत्कारमूर्तींमधून विलास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात संजयदादा गरुड यांनी संस्थेत ईमाने इतबारे या कर्मचाऱ्यांनी सेवा दिली त्यांच्या कार्याचा गुणगौरव संस्था नेहमीच करत राहील आमच्या कर्मचाऱ्यांना ऊर्जा देण्याचे कार्य संस्थेचे सर्व संचालक मंडळ व आम्ही सदोदित करीत आलेलो आहोत.आणि यापुढेही असे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी जी पाटील यांनी केले तर आभार प्रताप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी एल पाटील यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संचालक मंडळ व दादासाहेब संजय रावजी गरुड यांनी शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments