Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव सोयगाव येथे उत्साहात संपन्न “समाज सुसंघटित करून भारताला परमवैभव प्राप्त करून देणे हेच संघाचे ध्येय” – स्वप्नीलजी चौधरी



दत्तात्रय काटोले-सोयगाव

 दिशा लाईव्ह न्यूज --::---  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचा शताब्दी वर्षानिमित्त विजयादशमी उत्सव सोयगाव येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्धतेने साजरा करण्यात आला. या निमित्ताने पार पडलेल्या संघोष पथसंचलनात गणवेशधारी स्वयंसेवकांनी सोयगाव नगरात घोषणा देत प्रभावी संचलन केले. कार्यक्रमाचा समारोप आमखेडा येथील श्री गजानन महाराज मंदिर प्रांगणात झाला.

या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून जळगाव विभाग कार्यवाह श्री. स्वप्नीलजी चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,

“संघाचे कार्य हे राष्ट्रकार्य आहे. समाज सुसंघटित करून भारताला पुन्हा एकदा परमवैभव प्राप्त करून देणे हेच संघाचे अंतिम ध्येय आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की,“डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या संघाच्या या शंभर वर्षांच्या प्रवासात हिंदू समाजाचे आणि स्वयंसेवक कुटुंबांचे योगदान मोलाचे राहिले आहे. हिंदू समाजाने आपले स्वत्व विसरल्यामुळेच परकीय आक्रमकांनी आपल्यावर आघात केले. आता पुन्हा हे होऊ नये म्हणून समाजात एकात्मता आणि समरसतेची गरज आहे.”

स्वप्नीलजी चौधरी यांनी "पंच परिवर्तन" या संकल्पनेचा उल्लेख करत सांगितले की,“ संघाने सांगितलेली पंच परिवर्तन म्हणजे वैचारिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक स्तरावरील बदल समाजात घडवण्याची दिशा आहे. ही परिवर्तनं आपल्या जीवनात उतरवणं आवश्यक आहे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक सुभेदार सीताराम पाटील होते. शेंदुर्णी तालुका कार्यवाह श्री. रवींद्रजी पाटील यांची यावेळी उपस्थिती लाभली.

उत्सवात शिस्तबद्ध संचलन, राष्ट्रभक्तिपर घोषणा, स्वयंसेवकांचा उत्साह व नागरिकांची उपस्थिती यामुळे सोयगाव परिसर राष्ट्राभिमानाने भारलेला होता.


विशेष ठळक मुद्दे:-:-


संघाच्या स्थापनेच्या शताब्दीनिमित्त विशेष उत्सव


पथसंचलनातून राष्ट्राभिमानाचे प्रदर्शन


पंच परिवर्तनाच्या माध्यमातून समाजनिर्मितीवर भर


शेकडो स्वयंसेवकांची शिस्तबद्ध उपस्थिती



Post a Comment

0 Comments