Type Here to Get Search Results !

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पहुर येथे चक्काजाम आंदोलन दोन तास रोखला राष्ट्रीय महामार्ग



पहुर प्रतिनिधी- ता जामनेर 

दिशा लाईव्ह न्यूज -:-  धनगर समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ पहूर येथे जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर आज बुधवारी सकाळी तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. 

   धनगर समाज आरक्षणापासून वंचित असल्याची भावना समाज बांधवांनी व्यक्त केल्या. हजारो समाज बांधव यावेळी आपल्या मेंढ्यांसह उपस्थित झाले होते. 


पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी पहूर पेठ व परिसरातून मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी झाल्याने तब्बल दोन तास राष्ट्रीय महामार्ग रोखल्या गेला. 

दीपक बोराडे हे गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसले असून त्यांच्या समर्थनार्थ आज पहुर येथे हा रास्ता रोको करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments