Type Here to Get Search Results !

वाकडी ,फत्तेपुर ,लोणी ,पहूर, लोहारा परिसरात पिकांचे प्रचंड नुकसान .शेतकरी राजा हतबल-ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांनाची मागणी.मत्री महोदय गिरीश भाऊंनी लक्ष देण्याची गरज.


दिशा लाईव्ह न्यूज -:-  वाकडी.ता.जामनेर.दि.२५.०९.२५ 

वाकडी परिसरामध्ये गेल्या सप्ताह अगोदरच जोरदार पावसाने झोडपले असता, पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत होते, यामुळे शेतकरी राजा चिंतेमध्ये पडला असता,त्यातच पुन्हा दि.२२ सप्टेंबर रोजी रात्री वादळी वाऱ्यासह सुमारे दि.२३.सप्टेंबर रोजी रात्री वादळी वाऱ्यासह सुमारे एक ते दीड तास पडल्याने संपूर्ण शिवार जलमय होऊन पिक जमीन दोस्त झाली, 


यामुळे शेतातील मका,कपासी,केळी तर कडधान्य ज्वारी अशा विविध शेतीमध्ये अतोनात नुकसान झाल्याने अगोदर येणाऱ्या उत्पन्नाचे आतुरतेने वाट बघणारा अखेर तोंडी येणारा घास अस्मानी संकटामुळे हिरावून घेतलाने स्थानिक शेतकरी व परिसरातील बळीराजा हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे,

अशीच परिस्थिती असल्यास संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा पाठीशी शासनाने खंबीरपणे उभे राहून झालेली नुकसान भरपाई व ओला दुष्काळ जाहीर करुन तुटपुंजी मदत न देता सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकरी राजाला शासन दरबारी दखल घेऊन तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत.

Post a Comment

0 Comments