Type Here to Get Search Results !

मुलींनो, स्वसंरक्षणासाठी सज्ज व्हा ! एपीआय कल्याणी वर्मा पहूर 'जागर स्त्री शक्तीचा ' विशेष उपक्रमाचे आयोजन 'शौर्य स्पोर्ट्स ' च्या कराटेपटूंनी सादर केली प्रात्यक्षिके



पहूर प्रतिनिधी--,ता .जामनेर

दिशा लाईव्ह न्यूज -:-  मुलींनो स्वसंरक्षणासाठी सज्ज व्हा , इंटरनेटच्या फसव्या जाळ्यात न अडकता स्वतःला सिद्ध करा ,असे प्रतिपादन पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी केले .

 पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर . टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी आणि ज्ञानवेद प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित  'जागर स्त्री शक्तीचा ' या विशेष उपक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या .


पुढे त्या म्हणाल्या की , तुम्ही सर्वांनी पोलिसांसारखं जागल्याच्या भूमिकेत राहिले पाहिजे . वेळप्रसंगी 'दुर्गेच रूपही तुम्हाला घेता यायला हवं .

       प्रारंभी देवी सरस्वती  , पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व .किसनराव पाटील ,  कर्मयोगी डॉ .एम .आर . लेले , बालकवयित्री स्व .ज्ञानेश्वरी भामेरे  यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . 

       कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनंदा पाटील यांनी भूषविले .पहूर  ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे संचालक राजधर पांढरे यांनी प्रास्ताविक केले.निवृत्त मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते , आर . टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक एस .आर . सोनवणे , संस्था प्रतिनिधी किशोर पाटील , पर्यवेक्षक मधुकर आगारे ,  आर .बी .आर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर महाजन , सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे , विद्यादेवी भालेराव ,  एम . एच . बारी , शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक सचिव हरिभाऊ राऊत ,  चंदेश सागर , ज्ञानवेद प्रबोधिनीच्या उपाध्यक्ष कल्पना बनकर , संचालिका कवयित्री रूपाली माळी , विश्वस्त ईश्वर हिवाळे ,  सरोजिनी वानखेडे , मनीषा कंडारे , आदी मान्यवरांची उपस्थिती होती .


प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले . प्रमुख वक्त्या कल्याणी वर्मा यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले . शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक ईश्वर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जागृती चौधरी ,हर्षदा उबाळे ,  स्वाती चौधरी , माहेश्वरी धनगर , विमर्श क्षीरसागर , साहील सागर आदी खेळाडूंनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर केली .



     यशस्वीतेसाठी आर .टी . देशमुख , शंकर भामेरे , प्रकाश जोशी , कैलास पाटील ,अनिरुद्ध जोशी , सुरज कलाल , स्वप्निल जैन , निलेश सोनार , रवींद्र लाठे , मनोज चौधरी आदींचे सहकार्य लाभले . 

या कार्यक्रमात विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या .सूत्रसंचालन रंजना थोरात यांनी केले . आभार ज्ञानवेद प्रबोधिनीच्या उपाध्यक्षा कल्पना बनकर यांनी मानले .

Post a Comment

0 Comments