दिशा लाईव्ह न्यूज --::-- विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींच्या कार्याला गती देण्यासाठी तसेच ती सतत मिळावी म्हणून विविध सेवाभावी संस्था तसेच विविध सेवाभावी कार्यात कार्यरत असलेल्या घटकांना सदरील पुरस्काराचे मानकरी ठरवले जाते.
लोहारा येथील डॉ. जे. जी .पंडित माध्यमिक विद्यालय आणि शेंदुर्णी येथील गरूड विद्यालयाचे माजी विद्यार्थी अर्जुन भोई हे या राष्ट्रीयगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
सी के सक्सेना रिटायर्ड आर्मी आँफीसर हे कम्युनिटी लिडर म्हणून या वाय एस एस फाऊंडेशनचे काम पाहतात तर कमल चौधरी, रिटायर्ड अधिकारी वित्त विभाग हे सदरील फाऊंडेशनचे प्रेसिडेंट म्हणून काम पाहत आहेत .
सोबतच या फाऊंडेशनचे कार्य रिटायर्ड आर्मी आँफीसरच्या पॅनलच्या माध्यमातूनही पाहिले जाते. आज पर्यंत अर्जुन भोई हे अनेक मान सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.
सन्मानार्थी श्री अर्जुन भोई सर यांचे प्रथम दिशा लाईव्ह न्यूज परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन.



Post a Comment
0 Comments