दिशा लाईव्ह न्यूज---:::---पहूर ता. जामनेर
परतीच्या पावसाने पहूर शिवारात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संजय गणपत बनकर यांच्या शेतातील कपाशीचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, अशीच परिस्थिती परिसरातील इतर शेतकऱ्यांचीही कमी-अधिक प्रमाणात आहे.
कपाशी, उडीद, मूग, मका व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. कपाशीवरील कैऱ्या अतिवृष्टीमुळे कुजण्यास सुरुवात झाली आहे.
निसर्ग कोपल्याने तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून मदतीची मागणी केली आहे.


Post a Comment
0 Comments