Type Here to Get Search Results !

तलवारीची दहशत माजवणाऱ्या कुऱ्हाड तांडा येथील एकास अटक.पिंपळगाव पोलिसांची दमदार कामगिरी.-

 



दिशा लाईव्ह न्यूज --::-- पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमधील  कायद्याचा धाक  प्रतिदिन कमी होत चालला होता.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून नवीनच रुजू झालेल्या सहा. पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी गुंडगिरी करणाऱ्यांवर चांगलाच वचक बसविला आहे.तर अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणून सोडले आहे.

अशीच एक घटना   पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवासी अर्जुन किसन बंजारा याने गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याच्या घरात तलवार बाळगून आहे व एखाद्यावेळी त्याच्याकडून मोठा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी गोपनीय माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. कल्याणी वर्मा यांना मिळाली होती.



या मिळालेल्या माहितीची खात्री करुन घेण्यासाठी कर्तव्यदक्ष  पोलीस हेडकॉन्स्टेबल  अतुल पवार, शैलेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, प्रमोद वाडिले यांना पाठवले असता त्यांनी अर्जुन किसन बंजारा याला ताब्यात घेतले व विश्वासात घेऊन तलवारीबाबत विचारपूस केली असता त्याने तलवार असल्याचे कबुल करत मी ती तलवार पत्र्याच्या कोठीत ठेवली आहे असे सांगितले व कबूली देत दोन पंचासमोक्ष पत्र्याच्या कोठीत ठेवलेली तलवार पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल पवार यांना काढून दिली.




काढून दिलेली  तलवारीचे २६ इंच लांब पाते, सात इंच लांबीची पितळी मुठ अशी ३३ इंच लांब, ०४ सेंटीमीटर रुंदीच्या पात्याची ज्या पात्यावर "सिरोही की वारंटी ३० साल वारंटी " असे लिहिलेली पाच हजार रुपये किंमतीची तलवार पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल पवार यांनी पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त केली असून याबाबत कुऱ्हाड तांडा येथील रहिवासी अर्जुन किसन बंजारा वय वर्षे (२९) याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर २७९/२०२५ भारतीय शस्र अधिनियम १९५९ चे कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल पवार हे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments