कृष्णा पाटील,फत्तेपूर -तोरणाळे.
दिशा लाईव्ह न्यूज --::-- जामनेर तालुक्यातील तोरणाळे येथे नवरात्री उत्सवानिमित्त दुर्गा मातेची घटस्थापने साठी गावातील भक्तांनी श्री क्षेत्र इच्छा देवी (मध्यप्रदेश) ते तोरणाळे गावा पर्यंत हातात अखंड ज्योत घेऊन शंभर किलो मिटर चा प्रवास पायी करण्यात येऊन अखंड ज्योत आणि दुर्गा मातेची मूर्ती गावाला नगर प्रदिक्षणा मारत असताना ढोल ताश्याच्या गजरात प्रत्येक घरासमोर पूजा व आरती केल्या नंतर घटस्थापना व दुर्गा देवी स्थापना करण्यात आली.
फत्तेपूर येथील सह पोलीस निरीक्षक अंकुश जाधाव यांनी चालू असलेला नवरात्री उस्तवाला प्रत्येक मंडळाना भेट देऊन चालू असलेल्या उत्सवामध्ये गैर शिस्त होणार नाही. आपल्यामुळे इतरांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. काही अडचनी निर्माण झाल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क साधण्याचे आव्हान त्यांनी गावाकऱ्यांना केले.त्या नंतर त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला..
दरवर्षी येणाऱ्या शारदीय नवरात्रीचा पर्व हा दुर्गा मातेची भक्ती आणि शक्ती चे प्रतीक आहे. शक्तीची साधने या पावन पर्वा मध्ये देवीचे नऊ रूपाची पूजा करण्यात येते आणि प्रत्येक घरा मध्ये आई भगवती मातेचे स्वागताची तयारी केली जाते.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना सोबत महापर्वाची सुरुवात होते. नऊ दिवस सकाळ आणि संध्याकाळी दुर्गा मातेची माहाआरती व उपवास केला जातो. सकाळी गावातून दुर्गा माता दौड काढली जाते.रात्री देवी समोर जागरणपर भजन,कीर्तन,दांडिया गर्भा खेळून आनंदाने नऊ दिवस भक्तिमय वातावरण निर्माण होते...





Post a Comment
0 Comments