Type Here to Get Search Results !

महिलांनी आपल्या सुरक्षिततेसाठी कायम नवदुर्गा बना. सहायक पोलीस निरीक्षक सौ.कल्याणी वर्मा. कुऱ्हाड येथे विविध ठिकाणी स पो नि वर्मा यांच्या हस्ते आरती



सुनील लोहार -प्रतिनिधी. कुऱ्हाड 

 दिशा लाईव्ह न्यूज -:-  नवरात्री उत्सवानिमित्त कुऱ्हाड खुर्द येथे गुरुवारी संध्याकाळी पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ कल्याणी वर्मा यांच्या हस्ते गावातील महत्वाच्या दुर्गा देवी मंडळात त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली .


यावेळी गावातील सावता मंडळ,स्नेही दुर्गा मंडळ ,व प्लॉट  भागातील महाकाली दुर्गा मंडळ,तसेच बारीची भवानी माता आदी ठिकाणी त्यांना आरतीचा मान देण्यात आला. 

या प्रत्येक मंडळात त्यांनी महिलांशी संवाद घातला .सर्वच महिलांची आस्तेवाईक पने विचारपूस केली.पाचोरा रस्त्यावरील सावता मंडळातील महिलांना सहायक पोलीस निरीक्षक सौ कल्याणी वर्मा यांनी महिलांना अर्धा तास मार्गदर्शन केले.

 नवरात्री सणाचे महत्व ,तसेच महिलांनवर होणारे अन्याय ,अत्याचार,किशोरवयीन मुलींची सुरक्षितता, मुलांना मोबाईल वापराचे होणारे दुष्परिणाम,गावातील अवैध धंदे ,पोलिसांचा बंदोबस्त या विषयांवर त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. 


या संपूर्ण कार्यक्रमास श्रीधर महाजन डॉ.प्रदीप महाजन,कविता महाजन,अरुण पाटील,सतीश देशमुख, पंकज वाघ,योगेश माळी,ऋषिकेश चौधरी, विकास देशमुख,पत्रकार सुनील लोहार ,मंगेश चौधरी,महिला पोलिस मंजू खंडारे,पोलीस अमोल पाटील, प्रमोद वडीले,चालक दीपक अहिरे उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments