Type Here to Get Search Results !

पहूर येथे नवरात्रोत्सवाचा जल्लोष देव्यांच्या मंदिरात दिव्यांची रोषणाई श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे 'ज्योतीं 'चे स्वागत !


पहूर ता जाममेर 

 दिशा लाईव्ह न्यूज --::-- शारदीय नवरात्रोत्सवास आज पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून येथे देव्यांच्या मंदिरांमध्ये दिव्यांची आरास साकारण्यात आलेली आहे .

      नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी निवासिनी मातेच्या वनी गडावरून 'ज्योत ' घेऊन आलेल्या भाविकांचे श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे ईश्वर हिवाळे यांनी स्वागत केले . 



   गावातील जय भवानी माता मंदिर ,  संतोषी माता मंदिर , रेणुका माता मंदिर ,  दुर्गा भवानी माता मंदिर , ग्रामदैवत मरीआई मंदिर या सर्वच मंदिरांमध्ये घटस्थापना करण्यात आली असून विद्युत दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे .

यासोबतच गावात विविध ठिकाणी दुर्गा मंडळांनी मुर्त्यांची स्थापना केली असून भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे . 

     नवरात्र उत्सवात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून 

अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळ कार्यकर्त्यांनी सजग राहण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments