Type Here to Get Search Results !

आवडत्या शिक्षकाची बदली अन विद्यार्थी,गावकऱ्यांना अश्रू अनावर....


 दिशा लाईव्ह न्यूज --::--      जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी दिगर शाळेतील शिक्षक संदिप पाटील यांची नुकतीच जिल्हांतर्गत ऑनलाईन बदली झाली.त्यांना निरोप देताना विद्यार्थी,गावकरी,माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी सर्वांनाच अश्रू अनावर झाले.

संदिप पाटील यांची वडाळी दिगर शाळेत सहा वर्षापेक्षा जास्त सेवा झाली.या काळात त्यांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेत विद्यार्थी गुणवत्ता विषयक नवनवीन उपक्रम राबविले.विद्यार्थ्यांना स्वच्छता, शिस्त विषयक चांगल्या सवयी  लावल्या.गावकऱ्यांशी प्रेमाचे,  जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले.संदिप पाटील यांच्या विविध उल्लेखनीय उपक्रमांमुळे गावातून बाहेरगावी खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणारे अनेक विद्यार्थी गावकर्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत दाखल केले.


संदिप पाटील यांनी गावकऱ्यांचे देखील शाळेसाठी वेळोवेळी सहकार्य प्राप्त करून घेतले.मात्र या वर्षाच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत गावातील सर्वांचे आवडते असणारे संदिप पाटील सरांची बदली झाल्याने सर्वांनाच अश्रू अनावर झाले.शाळा व्यवस्थापन समिती,गावातील नागरिक, ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी अशा सर्वांनी निरोप सत्कार समारंभ आयोजित करत संदिप पाटील यांच्या गावातील शैक्षणिक कार्याबद्दल भावना व्यक्त केल्या,शाल,श्रीफळ देत सत्कार केला.निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी गावातील नागरिक,पदाधिकारी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वडाळी दिगर शाळेत नोकरी करीत असताना गावकरी,पालक  यांच्या सहकाऱ्याने विविध गुणवत्ता वाढीचे उपक्रम राबविता आले.बाहेरगावी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणारे विद्यार्थी गावातील जि.प.मराठी शाळेत दाखल होऊ लागले.शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलाबजावणी केली.विद्यार्थी पटसंख्या वाढ झाली.विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रम शाळेत साजरे केले.स्वच्छता,शिस्त विषयक सवयी मुलांना लागल्या.याकामी शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत,शिक्षण विभागाचे अधिकारी यांचे मार्गदर्शन,सहकार्य लाभले.विद्यार्थी,पालक यांचा शाळेविषयी मोठा जिव्हाळा निर्माण झाला यामुळे बदलीच्या वेळी सर्वांना अश्रू अनावर झाले व भावनिक निरोप देण्यात आला.


Post a Comment

0 Comments