दिशा लाईव्ह न्यूज---:::--- भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा व शुभमन गिल सलामीला फलंदाजीस आले. अभिषेक शर्माने पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूतच षटकार लगावत भारतीय संघाच्या फलंदाजीची दमदार सुरुवात केली तर शुभमन गिल आणि अभिषेक शर्माच्या जोडीने पाकिस्तानी गोलंदाजीवर धडाकेबाज फलंदाजी केली.
दहाव्या षटकात अर्धशतका पर्यंत पोहचलेल्या शुभमन गिलला फहीम अश्रफने बाद केले. शुभमन गिलने २८ चेंडूत ८ चौकार लगावत एकूण ४७ धावा केल्या. शुभमन गिल पाठोपाठ फलंदाजीस आलेला सुर्यकुमार यादवला अब्रार अहमदने शून्य धाव संख्येवर झेल बाद केले.
१३ व्या षटकात अब्रार अहमदच्या गोलंदाजीवर हॅरीस रौफने अभिषेक शर्माला झेल बाद केले. अभिषेक शर्माने ३९ चेंडूत ५ षटकार व ६ चौकार लगावत एकूण ७४ धावा केल्या. १७ व्या षटकात हॅरीस रौफच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन १७ चेंडूत १३ धावा करत बाद झाला. तिलक वर्माने १९ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या तर हार्दिक पंड्याने नाबाद ७ धावा केल्या. भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ गडी व ७ चेंडू राखून विजय मिळविला.

Post a Comment
0 Comments