Type Here to Get Search Results !

शेंदुर्णी नगरपंचायत निवडणूक : महाविकास आघाडीचे संघटनात्मक नियोजन आणि जनतेच्या प्रश्नांची ठळक मांडणी




दिशा लाईव्ह न्यूज  ---:::---- शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी तर्फे शेंदुर्णी शहरात नुकतीच संघटनात्मक चर्चा व नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रमुख पक्षांचे नेते, तालुकास्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             बैठकीचे अध्यक्षस्थान आणि प्रमुख मान्यवर

या बैठकीचे अध्यक्षस्थान तालुक्यातील लाडके नेतृत्व दिलीप खोडपे  यांनी भूषवले. यावेळीश्री प्रवीण भाऊ गरुड सामाजिक कार्यकर्ते. काँग्रेस तालुका अध्यक्ष एस.टी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर आप्पा पाटील, राजू दादा चौधरी. शिवसेना नेते युवराज बारी, कैलास शेट काबरा.शिवसेना शहरप्रमुख भैयाभाऊ गुजर, काँग्रेस शहराध्यक्ष अमरीश गरुड, काँग्रेस युवा मोर्चा अध्यक्ष करून सुर्वे.राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्रीराम काटे.शरीफ भाई.अशोक बारी .संदीप बारी.राजू पाटील .दिनेश बैरागी.आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

                   लोकांच्या समस्या : चर्चेचा केंद्रबिंदू

बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर कठोर शब्दांत टीका करण्यात आली.

श्री दिलीप खोडपे सर यांनी माननीय श्री तहसीलदार साहेब जामनेर यांच्या सोबत झालेल्या बैठकीचा संदर्भ घेत मतदार यादी साठी शासकीय बीएलओ सोबत राजकीय बीएलओ जोडणीसाठी त्याचे मोर्चे बांधणी संदर्भात आदेश देण्यात दिले.



श्री ए टी पाटील सरांनी मतदार याद्यांमधील घोळ. डुबलीकेट नावे व मयत मतदान कसे ओळखायचे या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले.

श्री किशोर आप्पा पाटील यांनी सर्व राजकीय बीएलओ टीमवर्क मध्ये काम करण्याचे व काही आवश्यक असल्यास मला फोन करा अशी सूचना देत उपस्थित आमचे लक्ष वेधले.

शिवसेना शहरप्रमुख भैयाभाऊ गुजर यांनी शहरातील उखडलेले रस्ते, ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत केवायसीच्या नावाने होत असलेली महिलांची लूट, तसेच बांधकाम कामगार महिलांना अद्याप न मिळालेला भांडे संच या विषयांवर आक्रमक भूमिका घेतली.


काँग्रेस शहराध्यक्ष अमरीश गरुड यांनी मतदार याद्यांमधील बोगस नावांचे प्रकरण आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांची नावे वगळण्याबाबत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


              निवडणूकपूर्व राजकीय समीकरणे

महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकत्र येऊन शेंदुर्णी नगरपंचायतीत सत्ता मिळविण्यासाठी सज्ज होत असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. विविध समस्या थेट लोकांपर्यंत पोहोचवून जनआंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना उघडे पाडण्याची तयारी आघाडीने दर्शवली.

                  आगामी आंदोलनाचा इशारा

कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावलेल्या या बैठकीत, शहरातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात लवकरच भव्य आंदोलन उभारण्याचा ठराव घेण्यात आला. महाविकास आघाडीची ही भूमिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण ठरणार असून, स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे.

                      निष्कर्ष

शेंदुर्णी नगरपंचायत निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून, ती सत्ताधारी आणि महाविकास आघाडी यांच्यातील ताकद आजमावण्याची संधी ठरणार आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून, येणाऱ्या काही दिवसांत या निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.



Post a Comment

0 Comments