सुनील लोहार, कुऱ्हाड तालुका पाचोरा -
दिशा लाईव्ह न्यूज --:::---कुऱ्हाड तांडा येथील ग्रामस्थांना विविध नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे.लाख रोड परिसरात सततच्या पावसामुळे घरासमोर पाण्याचे डबके तयार होऊन,हे पाणी घरांमध्ये येऊन , या ठिकाणी डास,मच्छर व वाढलेल्या गवतामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वावर वाढला असून यामुळे प्रत्येक घरातील लोक ,विशेषत लहान बालके आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
तसेच गटारीच्या पाण्याचा निचरा न होत असल्याने ,या घाण पाण्याच्या उग्र वासाने ग्रामस्थ हैराण आहेत. ग्रामपंचायतीला वेळोवेळी सांगून सुद्धा दखल घेतली जात नाही.
शुक्रवारी ग्रामपंचायत ने येथील गटारीच्या पाण्याचा प्रवाह जेसीबीच्या साह्याने मोकळा करीत असताना ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली होती.काही लोकांनी उघड्या गटारी ला विरोध करीत हे काम बंद पाडले होते. तसेच या परिसरात वाढलेल्या गवत,झाडे झुडपांमुळे मागील आठवड्यात एका महिलेला सर्पदंश होऊन तिला आपला जीव गमवावा लागला.
तसेच या परिसरातील महिलांना शौचास जाण्यासाठी या साचलेल्या पाण्यातून जावे लागत असल्याने ,यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
म्हणून तरी या परिसरात निर्माण होणारा आरोग्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.




Post a Comment
0 Comments