Type Here to Get Search Results !

पहूर येथील तीन कन्यांचे तालुका निबंध लेखन स्पर्धेत घवघवीत यश वैष्णवी, निशा आणि सुहाना यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे गौरव


पहूर  प्रतिनिधी-:-(ता. जामनेर) –

 दिशा लाईव्ह न्यूज --::--   महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय निबंध लेखन स्पर्धेत पहूर येथील तीन कन्यांनी घवघवीत यश संपादन केले. समितीच्या जामनेर शाखेतर्फे त्यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी नितीन किटे (इ. ९ वी) हिने किशोर गटात उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. तर आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी निशा संजय सोनवणे हिने तृतीय क्रमांक आणि सुहाना युनूस तडवी हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.


या तिन्ही विद्यार्थिनींचा शिक्षण विस्तार अधिकारी संजय पाटील, अध्यक्ष  दादासो यु. यु. पाटीलसर  ,कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे, प्रधान सचिव प्रतिभा दाभाडे, नाना लामखेडे, आबासाहेब पाटील पहूर शाखेचे कार्याध्यक्ष शंकर भामेरे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .

Post a Comment

0 Comments