Type Here to Get Search Results !

शेंदूर्णी येथील गरुड विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री बी एम कुमावत सरांची पदोन्नती व सत्कारसह निरोप!

                 


             

दिशा लाईव्ह न्यूज -:-  धी शेंदुर्णी से.एज्यु.को-ऑप सोसा.संचलित,आ.ग.र गरुड माध्य.व कनिष्ठ महाविद्यालयातील गणित विषयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री भक्तराज कुमावत यांची क.द.नाईक माध्यमिक विद्यालय पाळधी येथे संस्थेने मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केली असल्याने गरुड विद्यालयाच्या वतीने सरांचा खूप मोठ्या स्वरूपात विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस चौधरी यांच्या हस्ते व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समवेत सत्कार करून निरोप देत मुख्याध्यापक पदासाठी शुभेच्छा दिल्या.

श्री भक्तराज कुमावत सरांची गरुड विद्यालयातील  सेवा 22 वर्ष झालेली असून त्यांची संस्थेतील एकूण सेवा 30 वर्ष झालेली आहे.त्यांच्या या प्रदीर्घ  अनुभवाचा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला असून त्यांचे शिक्षण एम.एस्सी.बी.एड आहे.



सरांनी विद्यार्थी घडवत असतानाच एक आदर्श विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून जरी सरांचा लौकिक असला तरी एक आदर्श वडील म्हणून देखील सरांनी स्वतःच्या मुलांना त्यांच्या धर्मपत्नी स्मिता भक्तराज कुमावत(प्राथमिक शिक्षिका) लोहारा यांच्या सहकार्याने घडविले.

 त्यांचा मोठा मुलगा उमेश भक्तराज कुमावत मास्टर डेटा सायन्स( यु.के.)इंग्लंड येथे नोकरी करत असून लहान मुलगा ओम भक्तराज कुमावत बी.ई.कम्प्युटर सायन्स असून तो पुणे येथे नोकरी करीत आहे.

असे उच्च विद्याविभूषित मुलं घडविणारे पालक म्हणून सरांची व त्यांच्या धर्मपत्नी स्मिताताईंची ख्याती असल्याचं कार्यक्रमाचे अध्यक्ष आर.एस चौधरी सर यांनी व्यक्त केले.सरांच्या अंगी असणारी विनयशीलता विद्या विनयन शोभते या उक्तीप्रमाणे दिसून येत असल्याचं परिसरातील पालक वर्गांमधून व शिक्षक वर्गांमधून नेहमीच व्यक्त केले जात असते. 

श्री बी एम कुमावत सरांना संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजय रावजी गरुड,व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शेळके,सचिव काकासो.सागरमलजी जैन, सहसचिव दादासो यु यु पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड,वस्तीगृह सचिव गो गो सूर्यवंशी तसेच संचालक मंडळाने मुख्याध्यापक पदाला आपण योग्य न्याय देणार असे संबोधून शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments