दिशा लाईव्ह न्यूज ---:::------पाळधी ता जामनेर येथील जि प मुलांची केंद्र शाळेची नूतन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. ही व्यवस्था समितीची रचना पालकांमधून शासकीय निर्देशानुसार करण्यात आली.
सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कैलास राजपूत तर उपाध्यक्षपदी गोपाल वाणी यांची निवड करण्यात आली.
सदर सभा शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सोनाली ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्तम प्रकारे पार पडली तसेच सभेकरिता पालक वर्ग व महिला पालक वर्ग देखील उपस्थित होते. यामधून व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद पारधी शाळा मुलांची सर्वानुमते पालका मधून विनोद वाघ,गजानन शिंदे, मुकेश मराठे,उत्तम वाणी, गोपाल वाणी ,कैलास राजपूत ,योगेश भोंबे, प्रवीण सुरवाडे, शांताराम वाघ, शितल शिंदे, या मान्यवरांची समितीवर निवड झाली.
सदर सभेची रुपरेषा संभाजी हावडे यांनी मांडली तसेच या सर्व निवडक आम्ही शालेय शिक्षक वृंद नंदा अपार मॅडम, हेमलता पाटील मॅडम, जितेंद्र नाईक अमित मुंडे या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

Post a Comment
0 Comments