सौ.गीता भामेरे--हूर (ता. जामनेर)
दिशा लाईव्ह न्यूज ---::--- पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या तीन महिन्यांपासून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. या कालावधीत तीन वेगवेगळ्या प्रकरणांत तिघांनी आपले जीवन संपवले आहे.
जुलै महिन्यात पहूर कसबे येथील बारावीत शिकणारा महेश अनिल गोल्हारे (वय १८) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेचा तपास अद्याप सुरू असतानाच शेंदुर्णी दुरक्षेत्रातील जंगीपूरा येथे भाग्यश्री राहूल राजपूत (वय २८) या विवाहितेचा वीस लाखांच्या कारणावरून जीव घेतला गेला.
या घटनेने समाजमन सुन्न झालेले असतानाच वाकोद येथील अकबर तडवी (वय २८) या तरुणाने अपमान सहन न झाल्याने विष प्राशन करून जीवन संपविले.
या तीनही घटनांमधील कारणे वेगवेगळी असली, तरी एक समान धागा मात्र दिसून येतो — कोणीतरी आत्महत्येस प्रवृत्त करत आहे आणि त्यात कुणाचातरी बळी जात आहे.
प्रश्न असा आहे की — हे असेच चालू राहणार का? आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर प्रशासन कठोर कारवाई करणार का?
आजची तरुणाई अशा आत्महत्यांच्या चक्रव्यूहात का आणि कशी अडकत आहे? आत्महत्येस प्रवृत्त होण्यापूर्वी तरुणांचे मानसिक आरोग्य कसे बळकट करता येईल?
या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल होणे गरजेचे असल्याचे मानसिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
Post a Comment
0 Comments