दिशा लाईव्ह न्यूज --::-- दिनांक 8 ऑक्टोंबर 2025 रोजी स्वामी लॉन्स येथे गुरुपुत्र आदरणीय श्री. चंद्रकांत दादा मोरे यांच्या हस्ते पाचोरा शहर व तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली.
.पाचोरा तालुका व शहर मिळून आतापर्यंत 477 परिवाराला मदतीचा एक हात मार्गातर्फ देण्यात आलेला आहे.
त्यात पाचोरा शहर ,कडे वडगाव, गहूले, पिंपरी, सार्वे,शिंदाड या गावांचा समावेश आहे. यावेळी शासकीय रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.35 भाविक सेवेकरी यांनी यावेळी रक्तदान केले. मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप या सेवेचा सुद्धा 500 च्या वर नागरिकांनी लाभ घेतला.
आदरणीय श्री चंद्रकांतदादा मोरे, जगदीश बापू सोनार, केंद्र प्रतिनिधी सौ. रेखाताई पाटील, श्री दत्ताभाऊ सोनार यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सुरुवातीस पाचोरा विभागात सुरू असणारे विविध सामाजिक उपक्रम (रक्तदान शिबिर ,मोफत आरोग्य शिबिर ,पूरग्रस्तांना मदत कार्य, शाळा व गावात साफसफाई अभियान, बालसंस्कार मेळावे ,कृषी मेळावे, नदी साफसफाई अभियान, दिवाळी फराळ वाटप , ब्लॅंकेट वाटप) याबाबत सविस्तर माहिती प्रा. मनीष बाविस्कर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुवर्णसिंग राजपूत सर यांनी केले.
श्री.जगदीश बापू सोनार यांच्या सोन्या चांदीच्या भव्य शोरूम यांचे उदघाटन आदरणीय दादासाहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री राजेंद्र पंडित पाटील यांची रुग्णसेवा व कोरोना काळातील सेवा याकरता विशेष सन्मान आदरणीय दादासाहेब यांच्या हस्ते करण्यात आला तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला .
पूरग्रस्तांना मदत वाटप, रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राहुल बावचे सर, श्री.गजेंद्र चौधरी सर, श्री. संकेत बोरसे सर ,श्री. अंबालाल पवार सर ,श्री सुभाष दादा पाटील ,श्री किरण वाणी ,तेजस देव ,चेतन पवार ,जितेंद्र देवरे ,अक्षय सिनकर ,बबलू वाणी, विश्वजीत सर ,ज्ञानेश्वर चौधरी ,विष्णू भाऊ ,दुष्यंत सर ,लक्ष्मण सिनकर सर, श्री. ठाकरे सर, विकास पाटील यांनी विशेष मेहनत घेतली .
तर पाचोरा मेळावा यशस्वी होण्यासाठी श्री. गिरीश दुसाने ,श्री हर्षल चित्ते, अविष्कार वाणी ,श्री सुधीर महाजन सर, गणेश कापुरे दादा ,श्री ललित चित्ते, वेदांत पवार ,रवींद्र पाटील (मामा ),मयूर सोनवणे, सार्थक देव, गौरव, श्री उज्वल पाटील सर, कुमारी योगिता कुमारी अंकिता ,कुमारी जानवी कुमारी टिना सिनकर ,सौ. विद्या पाटील ,सौ ज्योती पाटील, सौ .जयश्रीताई ढवळे ,सौ .कीर्ती ताई येवले ,सौ. भोसले ताई ,सौ .रुपाली ताई पाटील ,सो .आशाताई पाटील ,सो. सविता धस ताई ,सौ. जयश्री पाटील ,सौं. कल्पनाताई परदेशी ,सौ. लताताई सिनकर ,सौ. वंदना चित्ते ,सौ कविता चित्ते ,सौ हर्षदा चित्ते अवीताताई पाटील यांनी परिश्रम घेतले.
या वेळी जळगाव, चाळीसगाव ,भडगाव ,शेंदुर्णी , कडे वडगाव , खडकदेवळा, तारखेडा, गाळण, बिल्दी, जारगाव, वाडी, शेवाळे, कुऱ्हाड,पाहाण, परधाडे, कासोदा, शिंदाड ,साजगाव ,गिरड ओझर ,मांडकी ,भातखंडे , नगरदेवळा ,पिंपळगाव थडीचे ,गोंदेगाव ,पळाशी ,बनोटी ,या सेवा केंद्रातील सेवेकरी उपस्थित होते.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Post a Comment
0 Comments