पहूर प्रतिनिधी--ता. जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज ---:::-----जंगीपुरा ( ता . जामनेर ) येथील विवाहितेच्या हुंडाबळी प्रकरणातून काल झालेल्या मृत्यूप्रकरणी सासरच्या पतीसह सासु , सासरे आणि दिर अशा चौघांना जामनेर न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .
वाळू वाहतुकीसाठी डंपर घेण्याकरिता माहेराहून हुंड्या पोटी 20 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या पतीने आई-वडिलांनी भावाच्या मदतीने पत्नीला गळफास घेऊन मुलीची हत्या केल्याची फिर्याद विवाहितेच्या वडीलांनी पहूर पोलीस ठाण्यात नोंदविली होती .
या प्रकरणातील चौघे संशयीतांच्या पहूर पोलिसांनी तातडीने मुसक्या आवळल्या होत्या .
त्यांच्यावर शारीरिक मानसिक त्रास देणे व मारहाण करण्याचे गुन्हे नोंदविण्यात आलेले असून आज गुरुवारी जामनेर न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले .
आज झालेल्या सुनावणीत जामनेर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे यांनी बोलताना दिली .
याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे सखोल चौकशी करत आहेत .
.jpg)

Post a Comment
0 Comments