Type Here to Get Search Results !

हिंदी चित्रपट जगतातील अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांच निधन. आज होणार अंत्यसंस्कार.

 



 दिशा लाईव्ह न्यूज-:- १९७०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या आणि काही काळापासून आजारी होत्या. ललित पंडित यांनी सांगितले की, नानावटी रुग्णालयात रात्री ८ वाजता त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुलक्षणा पंडित या संगीतकार जतिन-ललित आणि अभिनेत्री विजयता पंडित यांच्या बहिणी असून, त्यांचा अंत्यसंस्कार शुक्रवारी दुपारी होणार आहे.

सुलक्षणा पंडित (१२ जुलै १९५४ - ६ नोव्हेंबर २०२५) या एक भारतीय पार्श्वगायिका आणि अभिनेत्री होत्या, ज्यांनी १९७० आणि १९८० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले. त्या मेवाती घराण्यातील शास्त्रीय गायिका होत्या आणि त्यांनी 'उलझन', 'हेराफेरी', 'अपनापन' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी संजीव कुमार यांच्यावर प्रेम केले होते, परंतु त्यांनी तिचा प्रस्ताव स्वीकारला नाही, त्यामुळे त्या अविवाहित राहिल्या. 

जीवन परिचय
  • जन्म: १२ जुलै १९५४
  • निधन: ६ नोव्हेंबर २०२५
  • संगीत: त्या मेवाती घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या. 
अभिनय कारकीर्द
  • चित्रपट: त्यांनी १९७० आणि १९८० च्या दशकात 'उलझन', 'संकोच', 'हेराफेरी', 'अपनापन', 'चेहरे पे चेहरा' आणि 'धरम कांटा' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
  • सहकलाकार: त्यांनी जितेंद्र, संजीव कुमार, राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्या कलाकारांसोबत काम केले.
  • बंगाली चित्रपट: त्यांनी १९७८ मध्ये उत्तम कुमारसोबत 'बंदी' या बंगाली चित्रपटातही काम केले. 
वैयक्तिक आयुष्य
  • प्रेमसंबंध: १९७५ मध्ये 'उलझन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना अभिनेता संजीव कुमार यांच्यावर प्रेम झाले. त्यांनी त्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला, पण संजीव कुमारने तो नाकारला कारण ते हेमा मालिनी यांच्यावर प्रेम करत होते.
  • विवाह: संजीव कुमारच्या नकारानंतर त्यांनी लग्न केले नाही आणि त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या.
  • कुटुंब: त्या संगीतकार जोडी जतिन-ललित आणि अभिनेत्री विजेता पंडित यांच्या मोठ्या बहीण होत्या. 
  • सुलक्षणा पंडित या अतिशय सुंदर आणि मधुर आवाज असलेल्या अभिनेत्री आणि गायिकेचं संजीव कुमारवर प्रेम होतं, तिने त्यांना प्रपोज देखील केलं होतं पण संजीव कुमारचा जीव हेमा मालिनीवर जडला असल्याने त्यांनी सुलक्षणा पंडित यांना नकार दिला. आयुष्यात कधी, केव्हा, कोण कोणाला का आवडेल किंवा का आवडणार नाही, हे सांगणं अतिशय कठीण आहे! प्रेमाची व्याख्या तशी कुणाला करता आलीच नाही!

  • सुलक्षणा पंडित यांचं पारिवारिक जीवन कटकटींनी भरलेलं होतं. त्यांचे वडील, दोन्ही काका, (एक काका पंडित जसराज), बंधू प्रसिद्ध संगीतकार जतीन-ललित, मंधीर हा अजून एक भाऊ देखील संगीतकार, एक बहीण सुप्रसिद्ध अभिनेत्री विजयता, तिचा नवरा सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव, चुलत बहीण सुप्रसिद्ध गायिका हेमलता... सारेच संगीत क्षेत्राशी संबंधित असले तरी त्यांचं प्रत्यक्ष जीवन मात्र संगीतमय होऊ शकलं नाही! वडिलांनी दुसरा विवाह केला आणि या परिवाराला गरिबीचे दिवस आले. त्यांनी गायन सुरु केलं. हळूहळू अभिनय क्षेत्रातही उतरल्या. दोन्ही क्षेत्रात त्यांनी नाव कमावलं. पण आईचं, मोठ्या भावाचं निधन, सिनेसृष्टीत अपेक्षित यश न मिळणं, अपघात (बाथरूममध्ये पाय घसरून पडणं) अशा अनेक घटनांनी त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक आघात केले. संजीव कुमारसाठी त्या कायम अविवाहित राहिल्या! त्यांच्या अपुऱ्या प्रेम कहाणीसाठी 'सरस्वती चंद्र' चित्रपटातील गीतकार इंदीवर यांनी लिहिलेल्या आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या या ओळी आठवतात,

  • तन से तन का मिलन हो न पाया तो क्या
  • मन से मन का मिलन कोई कम तो नहीं
  • खुशबू आती रहे दूर से ही सही
  • सामने हो चमन कोई कम तो नहीं
  • चाँद मिलता नहीं सबको सँसार में
  • है दिया ही बहुत रोशनी के लिए

  • त्यांच्या जीवनातील संजीव कुमार नावाचा दिया गेला.
  •  आणि त्या डीप डिप्रेशनमध्ये गेल्या!

  • दिल में ऐसा दर्द छुपा है, मुझसे सहा न जाए
  • कहना तो चहू अपनों से मई, फिर भी कहा न जाये
  • आँसू भी आँखों में आये, चुपके से पी जाऊ

  • जीवन के पिंजरे में, मनन का ये पंछी
  • कैसे कैद से छूटे
  • जीना होगा इस दुनिआ में, जब तक साँस न टूटे
  • दम घुट ता है अब सांसो का, कैसे बोझ उठाऊ
  • अपने जीवन के इस उलझन को कैसे मैं सुलझाऊ..

  • उलझन चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेलं हे सुंदर गाणं त्यांचं जीवन झालं! 
  • आयुष्यातील उलझन त्या कधीही सोडवू शकल्या नाहीत! 
  • ज्या अभिनेत्यावर जीवापाड प्रेम केलं, 
  • त्याच्याच मृत्यूच्या दिवशी त्यांचं निधन व्हावं! किती विलक्षण योगायोग आहे! 
  • ६ नोव्हेंबर रोजी संजीव कुमार यांच्या मृत्यूनंतर जवळपास
  •  ४० वर्षांनी त्याच तारखेला त्यांचा मृत्यू झाला! 
  • जीवापाड प्रेम कदाचित यालाच म्हणत असावं!

  • प्रतिभासंपन्न अभिनेत्री व गोड गळ्याची गायिका सुलक्षणा पंडित यांना
  •  भावपूर्ण श्रद्धांजली! 

  • (७ नोव्हेंबर, २०२५)

Post a Comment

0 Comments