दिशा लाईव्ह न्यूज --::-- पाचोरा तालुक्यातील लोहारा येथून जवळच असलेल्या म्हसास गावची दिव्या विजय पाटील हिने सारंगखेडा येथील चेतक फेस्टीव्हलमध्ये घोड्यावर रपेट मारत पर्यटकांचे लक्ष वेधले आहे. तिला पाहून पर्यटकांनी टाळ्या वाजत तिला प्रोत्साहन दिले.
शेकडो घोडेस्वारांमध्ये एकटी दिव्या घोड्यावर रपेट मारताना दिसत होती. तिच्या जिद्दीला व मेहनतीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत होता. ती जीनियस स्कूल जळगाव येथे ८ वीच्या वर्गात शिकते.
तिला सारंगखेडा येथील होणाऱ्या रेसिंग स्पर्धेत भाग घ्यायचा आहे.
म्हसास येथील प्रगतिशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते अरुण मन्साराम पाटील यांची ती नात असून विजय अरुण पाटील यांची ती कन्या आहे.
लहानपना पासूनच तिला घोड्यावर बसण्याचे व रपेट मारण्याचे प्रशिक्षण वडील विजय पाटील यांनीच दिले आहे. वडिलांनी तिला घोडा चालवण्यासाठी प्रोत्साहित केले. दुसरीत असताना पहिल्यांदा घोड्यावर बसली होती.
त्यानंतर तिने घोडा चालवण्याची व पळवण्याची कला हस्तगत केली. तिने आतापर्यंत सिंघी, काठेवाडी, मारवाडी असे घोडे चालवले आहेत. अशी माहिती दिव्या पाटील हिने दिली.
लहानांपासून घोड्याविषयी आवड आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून मी माझा घोडा चालवण्याचा प्रवास चालू ठेवला
असून मला छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा मिळते असे तिने याप्रसंगी उपस्थितांशी बोलताना सांगितले.




Post a Comment
0 Comments