Type Here to Get Search Results !

जिद्दीने भरारी घेत उद्योग उभारणाऱ्या सौ.वंदनाताई चौधरी ठरल्यात तेली समाजाच्या समाज सारथी. खान्देश तेली समाज मंडळ चा दुसरा समाज सारथी पुरस्कार जाहीर!!

 



दिशा लाईव्ह न्यूज--::- - महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने दर पाच वर्षांनी मानाचा समाज सारथी पुरस्कार वितरित करण्यात येतो.२०२१ साली हे पुरस्कार देण्यात आले होते.

त्यानंतर यावर्षी देखील ठरल्याप्रमाणे समाज सारथी पुरस्कार देण्याचे नियोजन असून समाजातील तळागाळातील,समाजासाठी कार्य करणारे तसेच आपल्या जिद्द व मेहनतीने यश मिळवणारे अकरा समाजसेवक निवडून त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

आकर्षक सन्मानचिन्ह,मानपत्र, मानवस्त्र,पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असून मान्यवरांच्या हस्ते एका भव्य दिव्य अशा खास समारंभामध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात येतात.



दुसरा समाज सारथी पुरस्कार वाघाडी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील श्री लक्ष्मण पुंडलिक चौधरी यांच्या पत्नी सौ.वंदना लक्ष्मण चौधरी यांना जाहीर करण्यात आला असून,सौ.वंदना चौधरी यांनी अत्यंत जिद्दीने प्रयत्न करीत आपला उद्योग उभा करून सर्वत्र नावलौकिक मिळवलेला आहे.पापड उद्योगामध्ये भरारी घेत त्यांनी नागली,उडीद,ज्वारी,गहू,तांदूळ चे पापड तसेच शेवया व मॅगी आदी बनवून पुणे,नाशिक,मुंबई,हैदराबाद,बेंगलोर आदी ठिकाणी ते माल वितरित करीत असतात. 


सुरुवातीच्या काळात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये स्वतःचे मंगळसूत्र विकून त्यांनी पिठाची गिरणी सुरू केली.त्यानंतर गिरणीच्या माध्यमातून काही महिलांना सोबत घेऊन स्वतःचा पापड व्यवसाय सुरू केला व या पापड व्यवसायामध्ये प्रगती करून त्यांनी यश मिळवले. अनेक महिलांना त्यांनी आज रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे.वाघाडी गावात पिठाची गिरणी सुरू केल्यानंतर सोनगीर गावात येऊन त्यांनी पापड उद्योग सुरू केला.सुरुवातीच्या काळात त्यांनी स्वतः घरोघरी व गावोगावी फिरून पापड विक्री केली‌.हळूहळू त्या उद्योगामध्ये यशस्वी होऊन आज तुलसी पापड उद्योग या नावाने मोठा उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे. 


अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून उभा केलेला हा उद्योग आज नावारूपाला आलेला असून अनेक ठिकाणी त्यांचा सन्मान झालेला आहे.त्यांच्या या यशाचा,जिद्दीचा,मेहनतीचा,स्वाभिमानाचा विचार करून खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने त्यांना "समाज सारथी २०२६" हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे असे मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी व सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी कळवले आहे.



Post a Comment

0 Comments