दिशा लाईव्ह न्यूज --::-- लोहारा येथील विद्यमान सरपंच अक्षयकुमार जैस्वाल हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.
ही घटना काल ३० जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी सहा वाजता कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. निधनापूर्वी केवळ काही मिनिट त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांशी फोनवरून संभाषण केले होते. पुन्हा आराम करायचा म्हणून ते झोपले होते. आणि झोपेतच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे दुःखद निधन झाले. यामुळे काही मिनिटात गावात या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच, त्यांच्या निवासस्थानी गावातील आबाल-वृद्धांनी आपल्या लाडक्या भाऊंचे अंत्यदर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.
अक्षयकुमार जैस्वाल (वय ५९ ) हे काही दशक उपसरपंच व पंधरावर्षे पासून सरपंच पदी विराजमान होते.तर आता ही विद्यमान सरपंच असताना अवघा पंधरा दिवसात त्यांचा सरपंच पदाचा कार्यकाळ संपणार होता.
भाऊंनी बाबतीत काय बोलावे? एक अभ्यासू, शांत, संयमी, स्मितभाषी, कधीही द्वेषाचे सुडाचे राजकारण नाही, कोणाच्याही बाबतीत द्वेष कपट न ठेवता तात्विक विरोध ठेऊन कार्यरत राहणारा व्यक्ती, (सामाजिक राजकीय क्षेत्रात विरोधक असायलाच हवा, तेव्हा खरे कामे होतात, ही भूमिका नेहमी मनी ठेवणारा व्यक्ती) , सहकार क्षेत्रात नावाजलेले, प्रतिष्ठीत उद्योजक, व्यापारी, उत्कृष्ट वक्ता, सामाजिक व राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करून वर्ष 2000 सालापासून ते आतापर्यत सरपंच राहून इतक्या मोठ्या परिसराला दिशा देत स्वतःची ओळख निर्माण करणारा व्यक्ती तसेच वयाने वडीलधारी असूनही नेहमी मित्रा सारखे मार्गदर्शक ठरणारा अतिशय जवळचा व्यक्ती शांत झाला आहे.
भाऊ सरपंच पदी असतांना त्यांनी अनेक मोठी विकासकामे गावासाठी केली आहे.जलस्वराज योजना, मराठी मुलांची शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघूर पाणी पुरवठा योजना या सह अनेक विकास कामे त्यांचा कार्यकाळात झाली आहे.
सध्या गावातील रस्ते,प्रवेशद्वार, पाण्याची टाकी या सारखी अनेक कामे आजही गावात चालू आहे.
मात्र नियतीला त्यांची ही विकास गंगा बघवत नसावी.
भाऊंना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
संध्याकाळी साडेसात वाजता लोहारा येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांना आपले अश्रू लपवता आले नाही.अनेकांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट देऊन भाऊंना श्रद्धांजली अर्पण केली.
या घटनेने गावात व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी, सुन, नात असा परिवार आहे.


Post a Comment
0 Comments