Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघाची आदरांजली!!

  


काशिनाथ आल्हाट -:-जुन्नर प्रतिनिधी.

 दिशा लाईव्ह न्यूज --:---महाराष्ट्रातील नामवंत आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या  युवा ग्रामीण पत्रकार संघ  महाराष्ट्र  यांनी नुकतीच पुणे जिल्हा कार्यकारणी आणि जुन्नर तालुका कार्यकारणी व ग्राहक कल्याण फाउंडेशन नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना श्रद्धांजली नारायणगाव येथे अर्पण करण्यात  आली.


 यावेळी द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे  पुणे जिल्हा अध्यक्ष काशिनाथ आल्हाट म्हणाले की, "महाराष्ट्राला हादरा देणारी नुकतीच दुर्घटना घडली. संपूर्णतः महाराष्ट्रावर दुःखाचे सावट निर्माण झाले.  त्याचे कारण होते. महाराष्ट्राचा कर्तृत्ववान नेता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार माननीय अजितदादा पवार यांचे निधन झाले."

  "'महाराष्ट्राचा विकास पुरुष  हरपला" ही भावना  जनमानसांपासून पक्षाच्या उच्च नेत्यांपर्यंत आहे.

तसेच जुन्नर तालुका अध्यक्ष जयेश खांडगे म्हणाले,

"उपमुख्यमंत्री अजित दादा आणि माझा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळचा संबंध आला होता. त्यांच्या बोलण्याची आणि वागण्याची पद्धती मी जवळून अनुभवले होते "त्यांच्यासारखा करारी नेता होणे नाही. त्यांची भाषाशैली वैचारिक विचार मंथन वागण्यात आणि बोलण्यात रोखठोकपणा होता."

ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जुन्नर तालुका अध्यक्ष के.डी. उर्फ अण्णा सरोदे म्हणाले,

 "माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा हे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला महाराष्ट्र राज्याच्या विकासाची मोठी हानी झाली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले आहे. किंवा त्यांचा अपघात झाला आहे .हे मनाला आजही खरे वाटत नाही."


  या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश तोडकर ,ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा सौ. वंदना वाकचौरे, सदस्या सौ सुनिता कदम ,ज्येष्ठ नागरिक अरुण वाव्हळ, अण्णा फिटर, नवनाथ आल्हाट व इतर मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments