Type Here to Get Search Results !

कुऱ्हाड येथे भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात संपन्न

 


 दिशा लाईव्ह न्यूज --::--कुऱ्हाड तालुका पाचोरा  येथे श्री  भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 31 शनिवारी  सकाळी  गावातील सुतार,लोहार ,बेलदर समाजबांधव  यांनी सावता नगर येथील महादेव मंदिरात एकत्र येत भगवान  विश्वकर्मा महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करीत गावातून बँडच्या तालावर भजनी मंडळाच्या उपस्थित विश्वकर्मा महाराजांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. 


मिरवणुकीत सागर सुतार, सुनील लोहार, राजू लोहार, मोहन लोहार, भास्कर सुतार ,संतोष बेलदार, भिकन बेलदार, निवृत्ती बेलदार ,संदीप लोहार, विजय लोहार ,अशोक मिस्तरी ,गोलू मिस्तरी व महीलावर्गाने सहभाग घेतला होता .

प्रतिमा मिरवणुकीनंतर दुपारी बारा ते दोन दरम्यान  महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला .विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज बांधवांनमध्ये चैतन्य निर्माण होत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला .


**********************************************

*ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकार बांधवांना आपल्या न्याय आणि हक्कासाठी महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार संघटना.*

*द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य.*

*महाराष्ट्र सह मध्यप्रदेश, गुजराथ,उत्तर प्रदेश,या राज्यासह अनेक ठिकाणी कार्यरत.*

*जळगांव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, पारोळा, एरंडोल, जामनेर ,बोदवड,रावेर,यावल ,या सह सोयगाव येथे नवीन तालुका कार्यकारिणी गठीत करावयाची आहे.*

*ज्या पत्रकार बांधवांना संघटनेत जबाबदारी घेऊन काम करायचे असेल! त्यांनी त्वरित संपर्क साधावा.*

*जळगांव जिल्हाध्यक्ष-:- दिनेश चौधरी, लोहारा.*

*संपादक-:- दिशा लाईव्ह न्यूज.*

*9309918930*

Post a Comment

0 Comments