Type Here to Get Search Results !

महावीर पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न चिमुकल्यांच्या बहारदार कलाविष्काराने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध



पहूर प्रतिनिधी- (ता. जामनेर) :

दिशा लाईव्ह न्यूज --::--पहूर येथील नर्मदा फाउंडेशन संचलित महावीर पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. चिमुकल्यांच्या निरागस कलाविष्काराने संपूर्ण सभागृह आनंदाने भरून गेले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शेंदुर्णी एज्युकेशनचे अध्यक्ष संजय गरुड, पहूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भरत दाते व गणेश सुस्ते, महावीर पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्रदीप लोढा, जिल्हा परिषद सदस्य सौ. प्रमिलाताई पाटील, माजी सभापती संजय देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील, उपसरपंच श्याम सावळे व शरद पांढरे, सामाजिक कार्यकर्ते सागरमल जैन, योगेश बनकर, माजी सरपंच रामेश्वर पाटील, राजू पाटील, माजी उपसरपंच रवी मोरे, शाळेचे सचिव दीपक लोढा, ग्रामपंचायत सदस्य राजूभाऊ जेंटलमॅन, आर. टी. लेले हायस्कूलचे चेअरमन राजूभाऊ पाटील, अनिल मोरे, ईश्वर बारी, इरफान शेख, ॲड. संजय पाटील, श्यामराव गावंडे, प्रल्हाद वानखेडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. संभाजी क्षिरसागर, कवी शंकर भामेरे, पत्रकार ईश्वर हिवाळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रंगारंग कार्यक्रमांना उपस्थित पालकवर्ग व प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. प्रत्येक सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाट सभागृहात घुमत होता. पालकांनी आपल्या मुलांच्या कला गुणांचे मनापासून कौतुक करत शाळेच्या उपक्रमांचे अभिनंदन केले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली नेमाडे, सौ. दिपाली पाटील, अनिता क्षीरसागर, वर्षा वैदकर, कविता खाटीक, हर्षदा बेलपत्रे, छाया महाजन, अपेक्षा पन्यार, सिमरन सरपटे, आम्रपाली निकम, भाग्यश्री जाधव, तडवी मॅडम तसेच चव्हाण सर, आसिफ सर, सोनल भोंडे, किरण भट यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.



कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले डान्स टीचर रवी गोपाल व नितीन जळगाव यांनी विद्यार्थ्यांना दिलेले नृत्य प्रशिक्षण, ज्यामुळे सादरीकरण अधिक प्रभावी झाले.


शेवटी शाळा व्यवस्थापनाने सर्व मान्यवर, पालकवर्ग व उपस्थित प्रेक्षकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

0 Comments