काशिनाथ आल्हाट-::-जुन्नर तालुका.
दिशा लाईव्ह न्यूज --::-- निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील मातंग समाजाच्या श्रीमती कांताबाई संभाजी उनवणे यांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला .
श्रीमती कांताबाई उनवणे या निमगाव सावा येथील रहिवासी आहेत . जुन्या पिढीतील तिसरी शिक्षण शिकलेले आहेत. पारंपारिक पद्धतीचा व्यवसाय झाडू बनवणे , दोर तयार करणे हे करून पती कै.संभाजी उनवणे यांना संसारामध्ये मोलाची साथ दिली .शून्यातून आपला प्रपंच त्यांनी नावारूपास आणला.
मुलांना उच्च शिक्षण दिले. मुलगा मधुकर शिक्षक व सुधाकर पतसंस्था व्यवस्थापक तर दूरदृष्टीची ही माता आहे . या मातेन सुना सुध्दा उच्चशिक्षित केल्या. त्यांची एक सून सौ.स्वाती उनवणे या प्राथमिक शिक्षिका आहेत .तर दुसरी सून सौ मंगल उनवणे या निमगाव सावा येथील दिलीप वळसे पाटील महाविद्यालय एम ए इंग्लिश ,एम लिब म्हणून कार्यरत आहेत.
मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांनी शेतीवरती प्रेम केले. वय वर्ष 70 असतानाही शेळीपालन शेती पूरक व्यवसा स्वतः ते करतात .याशिवाय "शेती कसायची असते, शेती विकायची नसते ." हे त्यांचे धोरण आहे . याही वयात उत्तम पद्धतीने शेती करतात.
सध्या शेतीमध्ये ऊस, गहू ,हरभरा यासारखी उत्तम पिके स्वतः घेऊन इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरल्या आहेत.
जुन्या पिढीतील या माता कांताबाई उनवणे या वयाची परवा न करता. त्या म्हणतात "अजूनही मी म्हातारी झाले नाही ".मी उत्तम पद्धती शेती करू शकते असा आत्मविश्वास त्यांच्या दररोजच्या कामावरून दिसून येत आहे .
त्यांच्या स्वभावामुळे नातलग , पाहुणे अत्यंत सातत्याने त्यांच्या घरी येतात. माणसे संघटित करणे आणि त्यांच्यावरती प्रेम करणे असा साधा संदेश त्यांच्या दररोजच्या वागण्यातून येतो.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस अधिकारी बाळासाहेब सकाटे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शासन समाजभूषण पुरस्कार्थी काशिनाथ आल्हाट या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments