सौ.गीता भामेरे-:-प्रतिनिधी.
दिशा लाईव्ह नतुज ---:::--- पहूर (ता. जामनेर) : संतांच्या शिकवणुकीत जगाचे कल्याण सामावले असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा सुवर्णकार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अमृतयात्री शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी केले.
अहिर सुवर्णकार समाज मंडळातर्फे सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
बुधवार दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ८.३० वाजता हा पुण्यतिथी सोहळा मोठ्या श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम शिवभक्त रंगनाथ महाराज सोनार यांच्या अध्यक्षतेखाली खजिनदार जितेंद्र किसनशेठ सोनार यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.
प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या हस्ते संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित समाजबांधवांनी दर्शन व अभिवादन केले.
याप्रसंगी अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष गिरीश भामेरे यांनी संतांच्या कार्यावर प्रकाश टाकत मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. उपाध्यक्ष मयूर सोनार यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजासाठी मंगल कार्यालयाचे काम पूर्णत्वास नेल्याबद्दल गणेश भामेरे यांचा यावेळी विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमास ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत सोनार, रामकृष्ण जगताप, अरुण मोरे, भिकाशेठ निकुंभ, बाळू भामेरे, भागवत भामेरे, शिवभक्त निळकंठ महाराज सोनार, प्रदीप भामेरे, अशोक भामेरे, शिवांश मोरे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संत नरहरी महाराज सुवर्णकार समाज सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, शिव महापुराण कथा आणि भव्य यात्रोत्सवाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून शंकर भामेरे यांनी आभार मानले .
*********************************************
आंब्याचा झाडाला आलेला मोहर...सध्या सगळीकडेच आंब्याची झाड लक्ष वेधून घेत आहेत.या वर्षी आंब्याचे उत्पन्न नक्कीच जास्त येणार.लोहारा-नाचणंखेडा रोडवरील हे आंब्याचे झाड नक्कीच लक्ष वेधून घेत आहे.



Post a Comment
0 Comments