Type Here to Get Search Results !

जि.प. सदस्य पदम बापू पाटील ॲक्शन मोडमध्ये, शेतकरी कर्जमाफी गावनिहाय याद्या जाहीर करा!! महाराणी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना २०२६ : पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्याची मागणी




दिशा लाईव्ह न्यूज--::--- (प्रतिनिधी) १३मार्च २०२६: महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महाराणी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर कराव्यात, अशी मागणी करत मा. जिल्हा परिषद सदस्य श्री पदम बापू पाटील यांनी पाचोरा येथील प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले.


या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या योजनेअंतर्गत दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जावर २ लाख रुपयांपर्यंत (मुद्दल व व्याजासह) कर्जमाफी देण्यात येणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याची तरतूद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये व पात्र लाभार्थ्यांना स्पष्ट माहिती मिळावी, यासाठी गावनिहाय याद्या जाहीर करून त्या ग्रामपंचायत, चावडी, सोसायटी कार्यालय तसेच संबंधित बँकांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात. तसेच पारदर्शकतेसाठी या याद्या अधिकृत शासकीय संकेतस्थळावरही प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.


यावेळी महाराष्ट्र शासन व युती शासन तसेच  कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आभारही व्यक्त करण्यात आले.

निवेदन देताना श्री पदम बापू पाटील  जि प सदस्य कुरंगी बांबरुड गट ,शिवसेना तालुकाप्रमुख विनोद भाऊ तावडे ,श्री विजय पोपट पाटील (चेअरमन, विकास सोसायटी वेरूळी), श्री हेमराज ठाणसिंग पाटील* (माजी सरपंच, मोहाडी), श्री संतोष शिवाजी पाटील (शेतकरी), श्री राजू नारायण चौधरी, (शेतकरी) तसेच श्री रोहित कैलास पाटील, (माजी सरपंच आसनखेडा सुपुत्र) उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments