Type Here to Get Search Results !

लोहारा येथे २९ मार्च रोजी भव्य विराट हिंदू संमेलन--ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याचे आयोजकांचे आवाहन.




 🚩 ॥ भव्य हिंदू संमेलन ॥ 🚩


"जात-पात विसरूया, हिंदू म्हणून एक होऊया"


 दिशा लाईव्ह न्यूज --::--सर्व हिंदू बांधवांना, माता-भगिनींना आणि तरुण मित्रांना कळकळीचे आवाहन! आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आणि एकजुटीचा हुंकार देण्यासाठी आयोजित 'भव्य हिंदू संमेलनाला' सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहा.

                         विराट हिंदू संमेलन होणार .

हिंदू धर्म हा जगातील अत्यंत प्राचीन आणि समृद्ध संस्कृतींपैकी एक धर्म आहे. सहिष्णुता, मानवता, सत्य, अहिंसा आणि सर्व धर्मांचा आदर ही हिंदू धर्माची मूलभूत मूल्ये आहेत. “वसुधैव कुटुंबकम्” या विचारातून संपूर्ण जगाला एक कुटुंब मानण्याची शिकवण हिंदू धर्म देतो.

हिंदू धर्मात विविध परंपरा, सण-उत्सव, संस्कार आणि आध्यात्मिक विचारांची समृद्ध परंपरा आढळते. समाजात सद्भावना, नैतिकता आणि संस्कार टिकवून ठेवण्यासाठी हिंदू धर्म महत्त्वाची भूमिका बजावतो.

याच पार्श्वभूमीवर लवकरच  म्हणजे २९ मार्च रोजी लोहारा येथे विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आलेले असून या संमेलनाच्या माध्यमातून हिंदू संस्कृती, परंपरा आणि समाजातील एकता याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


🚩हिंदू तिथी- चैत्र शुद्ध ११, फाल्गुन शके-१९४७ 🚩 कामदा एकादशी म्हणजेच  ख्रिस्ताब्द

🗓 दिनांक: रविवार, २९ मार्च २०२६

🕓 वेळ: सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत

📍 ठिकाण: पाचोरा रस्ता, जि. प. मराठी मुलींची शाळा( कन्या शाळा), लोहारा, ता. पाचोरा


✨ प्रमुख उपस्थिती व आशीर्वाद:

• प.पू. महंत आचार्य श्री. येळमकर महाराजजी

• प.पू. श्री. आत्मारामनंदजी महाराज

• ह भ प योगेशजी महाराज


🎤 प्रमुख वक्ते:

• महामंडलेश्वर प.पू स्वामी जनार्दन हरी महाराज

• प.पू आचार्य श्री. मानेकर बाबा

• प पू श्री श्याम चैतन्य महाराज

• मा. श्री गिरीशजी अण्णासाहेब मोरे

• श्री योगेश्वर जी गर्गे


लोहारा हिंदू धर्म संमेलनाचे प्रमुख आकर्षण .


1. स्वतंत्र पूर्वीचा अखंड भारताचा भला मोठ्ठा नकाशा रांगोळी स्वरूपात रेखाटण्यात येणार आहे.

2. लव जिहाद ह्या इस्लामी हिरव्या रंगाच्या कट्टरपंथी पिळवलीनी माजवलेल्या जिहादचे रांगोळी स्वरूपात चित्र रेखाटण्यात येणार आहे.

3. तसेच संघ शताब्दी वर्षाच्या निमित्ताने पंच परिवर्तन विषयाचे देखील वेगवेगळ्या समाज प्रबोधन विषयाचे रांगोळी चित्र रेखाटण्यात येणार आहे.

4. मराठी अस्मिता देखील ठेवण्यात आलेली आहे.

5. हिंदू संस्कृती जसे की आपल्या संस्कृती मधील सर्व सण,वार,व्रत,वैकल्य, उत्सव त्याचे पूजा पद्धती तसेच त्याची प्रदर्शनी देखील ठेवण्यात आलेली आहे.

6. पर्यावरण व कृषी विषयावर प्रदर्शनी असून सेंद्रिय गो आधारित शेती या विषयावर देखील प्रदर्शनी ठेवण्यात आलेली आहे.

7. लव जिहाद व ख्रिश्चन मिशनरी यांच्याकडून धर्मांतरण या विषयावर देखील प्रदर्शनी करण्यात आलेली आहे.

अशा प्रकारे हिंदू धर्म संमेलन लोहारा गावात होणार असून यामध्ये सर्वांनी आपला सहभाग हिंदू म्हणून नोंदवावा.




Post a Comment

0 Comments