Type Here to Get Search Results !

गिधाडे येथे जिल्हास्तरीय नारी शक्ती पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा गौरव!! सामाजिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल शुभांगी ताई पाटील यांचा सन्मान..


दिशा लाईव्ह न्यूज--::--- गिधाडे (ता.शिरपूर) : स्व. योगिता पाटील सोशल वेलफेअर फाउंडेशन धुळे यांच्या वतीने जागतिक महिला दिन निमित्त जिल्हास्तरीय नारी शक्ती पुरस्कार २०२६ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.


जी.आर.पाटील माध्यमिक विद्यालय गिधाडे येथील प्रांगणात जागतिक महिला दिन आणि विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पाडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.


कार्यक्रमात समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, साहित्य, कला, क्रीडा, उद्योजक आदी क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २५ महिलांना नारी शक्ती पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात आले. सोबतीला विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी 

श्री राजेंद्र अग्रवाल (उद्योजक व नगरसेवक शिरपूर)

श्री राज सिसोदे ( नगरसेवक शिरपूर)

श्री अमोल सोनवणे (सामाजिक कार्यकर्ते, शिरपूर)


आदरार्थ सन्मानित प्रमुख महिलांची सविस्तर यादी (नाव — क्षेत्र) :


१.सौ. संगीता राजेंद्र देवरे (उपनगराध्यक्ष शिरपूर) सामाजिक सेवा

२.श्रीमती शुभांगी ताई पाटील - सामाजिक सेवा

३.श्रीमती डॉक्टर  नीता सोनवणे (गटशिक्षणाधिकारी शिरपूर)- शिक्षण प्रशासन 

४.श्रीमती वासंती  अहिरराव (शिक्षण विस्तार अधिकारी धुळे) - शिक्षण प्रशासन

५.श्रीमती डॉ. जयश्री मनोज निकम — आरोग्य सेवा

६.डॉ. स्मिता सुरेश पाटील — आरोग्य सेवा

७.श्रीमती शालिनीताई सोनवणे — विधी व न्याय

८.सौ. सीमा देविदास पाटील — शिक्षण

९.श्रीमती वैशाली देवरे (प्राचार्य)— शिक्षण

१०.श्रीमती सरोजा बागुल — सामाजिक सेवा

११.श्रीमती कनिका सुकवानी — उद्योजिका / उद्योग

१२.श्रीमती वंदना सुरेश पाटील — शिक्षण

१३.श्रीमती नूतन दिपक सोनवणे — सामाजिक सेवा (दामिनी पथक)

१४.श्रीमती अरुंधती रवींद्र चौधरी — सामाजिक सेवा (दामिनी पथक)

१५.श्रीमती रोशनी सखाराम पाटील — सामाजिक सेवा (दामिनी पथक)

१६.श्रीमती पोर्णिमा चंद्रकांत पाटील — सामाजिक सेवा (दामिनी पथक)

१७.कु. वैष्णवी भरत चौधरी — क्रीडा

१८.प्रा. डॉ. रजनी लुंगसे — साहित्य

१९.श्रीमती भावना भिमराव पाटील — शिक्षण

२०.श्रीमती डॉ. इंदिरा राजेसिंग गिरासे — शिक्षण

२१.श्रीमती सीमा भाऊराव पाटील — शिक्षण

२२.श्रीमती डॉ. हर्षदा रमण पाटील — क्रीडा

२३.श्रीमती सुनिता रत्नाकर पाटील -  साहित्य

२४.श्रीमती  नयना देवरे - उद्योजक

२५.श्रीमती विजयाबाई रवींद्र पाटील - सामाजिक सेवा


मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्त्री शक्तीचे समाजातील महत्त्व अधोरेखित करत महिलांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.आज आपण पाहतो की शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, प्रशासन, उद्योग, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अडचणींना न घाबरता, संघर्षाला सामोरे जात त्यांनी समाजासाठी प्रेरणेचा दीप प्रज्वलित केला आहे. अशा या धैर्यवान, कर्तृत्ववान आणि समाजाभिमुख महिलांना आजच्या कार्यक्रमात सन्मानित केल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो.


विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या मनोगतात मान्यवरांनी मत व्यक्त करताना सांगितले की 'शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान मिळविणे नाही, तर ते माणसाचे व्यक्तिमत्त्व घडविण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून ती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी, मूल्यांची जपणूक करणारी आणि उज्ज्वल भविष्य घडविणारी एक पवित्र जागा आहे.'

तसेच विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान, कला आणि विविध उपक्रमांमध्ये आपले कौशल्य दाखवून दिले आहे. आज त्या मेहनतीचा गौरव करण्याचा हा क्षण आहे. आज ज्यांना पारितोषिक मिळणार आहे ते विद्यार्थी निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्या यशामागे त्यांची जिद्द, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ आहे, असे म्हणत विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे कौतुक केले.




या प्रसंगी आयोजकांनी सांगितले की, स्व. योगिता पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वर्गीय योगिता पाटील सोशल वेल्फेअर फाउंडेशन मार्फत हा पुरस्कार सुरू करण्यात आला असून समाजात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आजचा हा कार्यक्रम केवळ सन्मानाचा नसून स्त्री शक्तीच्या गौरवाचा, प्रेरणेचा आणि सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा हा एक उत्सव सुरू केला आहे.


कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जे.एम.पाटील सर, श्रीमती एस बी पाटील मॅडम व श्रीमती स्वाती पाटील मॅडम यांनी सुरेख पद्धतीने पार पडले. 



कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ग्राम शिक्षण विकास मंडळ गिधाडेचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब मनोहर पाटील, उपाध्यक्ष माननीय दादासाहेब देविदास पाटील, सचिव श्रीमती सुजाता पाटील, तसेच स्वर्गीय योगिता पाटील सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब निखिल पाटील व उपाध्यक्ष सौ अनुराधा निखिल पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अमित बागले यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments