पहूर प्रतिनिधी-ता जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज ---:::----येथील पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर .टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची इ . ८ वीची विद्यार्थिनी कु. हर्षदा सुनिल चौधरी हिने ९८ गुण प्राप्त केले असून राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी ती पात्र ठरली आहे .
तिच्यासह शाळेतील शाळेच्या श्रेया गोरख महाजन , तृप्ती विजय चौधरी , मानसी मनोज बावस्कर , कीर्ती विजय सुरडकर , रवी विनोद खाटीक या सहा विद्यार्थ्यांनी या परीक्षेत चांगली कामगिरी केली आहे .
हर्षदाच्या उत्तुंग यशाबद्दल तिचा आई-वडिलांसह शाळेत मुख्याध्यापक एस आर सोनवणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी संस्था प्रतिनिधी किशोर पाटील , ज्येष्ठ शिक्षक विजय बोरसे , योगेश मालकर , आर . टी .देशमुख , अनिल पाटील , गोपाळराव थोरात , गिरीश भामेरे , संतोष भडांगे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
शाळेच्या या यशाबद्दल पालकांमधून अभिनंदन होत आहे .

Post a Comment
0 Comments