पहूर प्रतिनिधी-:-ता जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज--::---जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753f वर आज सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रॅक्टरने धडक दिल्याने दोन वीज खांब कोसळले तर याच अपघातात आयशर ट्रक नाली वर चढला मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही .
महामार्गावर पहूरकडून वाकोदकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरने ( एम एच . १९ सी झेड ४७ १६ )जबर धडक दिल्याने दोन वीज खांब खाली कोसळून ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली . ट्रॉलीतील बांधकाम साहित्य महामार्गावर विखुरल्याने वाहतुकीलाही काही काळ अडथळा निर्माण झाला होता . या अपघातात गोंधळलेल्या अवस्थेत छत्रपती संभाजीनगर कडून जळगाव कडे येणारी आयशर ट्रक ( क्र . एम . एच . २० जी झेड . २५ ३० ) चक्क नाली वर चढल्याने मोठी दुर्घटना टळली .
तात्काळ आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने आणि वीज खांब वायरमन पोलीस कर्मचारी आणि मदतनिसांच्या सहकार्याने व्यवस्थित केले .
यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता .


Post a Comment
0 Comments