पहूर,प्रतिनिधी-:- ता. जामनेर –
दिशा लाईव्ह न्यूज --::---“हिंदू मुलींनो, ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकू नका! आपल्या धर्माचा, संस्कृतीचा अभिमान ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानाची आठवण ठेवा — त्याग व्यर्थ जाऊ देऊ नका!” अशा ज्वलंत शब्दांत ह. भ. प. अनिल महाराज देवळेकर यांनी हिंदू समाजाला झंकारून सोडले.
पहूर येथील महात्मा फुले मंगल कार्यालयात पार पडलेल्या विराट हिंदू संमेलनात त्यांच्या भाषणाने अक्षरशः वातावरण तापले. प्रत्येक शब्दातून हिंदुत्वाचा अंगार उसळत होता आणि उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण होत होते.
“धर्मांतरण, ‘लव्ह जिहाद’ यांसारख्या कटकारस्थानांना थोपवण्यासाठी आता प्रत्येक हिंदूने जागृत व्हायलाच हवे. एकजूटच आपली ताकद आहे!” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
तसेच, “पहूरसारख्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभे राहिलेच पाहिजे,” अशी ठाम मागणीही त्यांनी केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमाता आणि शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. जिल्हा प्रचारक सौरभ माटेफळकर यांनीही प्रभावी मार्गदर्शन केले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी हेमंत जोशी होते.
व्यासपीठावर ह भ प ईश्वर महाराज पाळधी , ह भ प गजानन महाराज लोंढरी , ह भ प प्रकाश नंदजी महाराज नाचणखेडा या संत-महंतांची उपस्थिती लाभली .
तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावून संमेलनाची दखल घेतली.
प्रास्ताविक ह भ प मुकुंद महाराज पहुरकर यांनी केले . शुभांगी फासे यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले .
यावेळी सारा परिसर मंत्रमुग्ध झाला होता . संत महंतांचा सकल हिंदू समाजाच्या वतीने स्नेहवस्त्र पुष्पगुच्छ आणि पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला .
भगव्या लाटेने पहूर दणाणले!
संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रांनी संपूर्ण पहूर नगरी भगव्या रंगात न्हाऊन निघाली. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकींनी वातावरण अक्षरशः दणाणून सोडले.
उस्फूर्त जनसागर
पहूरसह परिसरातील अनेक गावांतून हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. माता-भगिनींचीही लक्षणीय उपस्थिती होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर धर्माभिमान स्पष्ट दिसत होता. यशस्वीतेसाठी सकल हिंदू समाजाने परिश्रम घेतले . पहूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .
क्षणचित्रे
वाघूर नदीवरील पूल भगव्या ध्वजांनी झळकला
“वंदे मातरम”च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला
लहानग्या त्रिशा जाधवच्या ‘पसायदान’ने भावनिक समारोप
हभप अनिल महाराजांच्या जाज्वल्य वाणीने जनतेत चेतना निर्माण
राजकारणापलीकडील व्यासपीठामुळे कार्यक्रमाला वेगळी धार


Post a Comment
0 Comments