दिशा लाईव्ह न्यूज --: ---लोहारा येथील ज्येष्ठ पत्रकार नाना भाऊ राजपूत यांचे वडील कै. एकनाथ देवचंद राजपूत (वय ८६) यांचे आज (दि. ८ जुलै) दुपारी १.४५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
कै. एकनाथ राजपूत यांनी अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या बळावर आपल्या कुटुंबाचा संसार उभा केला. मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी मोठ्या धैर्याने व कष्टाने पार पाडल्या. साधी राहणी, मनमिळावू स्वभाव आणि सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने वागणे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती.
गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाशी ते आत्मीयतेने संवाद साधत. सामाजिक सलोखा जपणारे, कुटुंबवत्सल आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या निधनामुळे राजपूत कुटुंबासह लोहारा गावात शोककळा पसरली असून, अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, चार मुली, सुना, दोन नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आजच संध्याकाळी ठीक ७ वाजता करण्यात येणार आहे.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व राजपूत परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment
0 Comments