दिशा लाईव्ह न्यूज--::-- (दिनेश चौधरी, लोहारा ) --धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारे संचलित डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय, लोहारा येथे धी शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचा ८२ वा वर्धापन दिन शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षण, संस्कार आणि गुणवत्तेची परंपरा जपणाऱ्या संस्थेच्या या वर्धापन दिनानिमित्त विद्यालय परिसरात आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष अ. अ. पटेल सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाज्ञा इंटरप्राईजेसचे संचालक किरण चव्हाण, दीपक चव्हाण, कैलास आप्पा चौधरी, गणेश भाऊ बाविस्कर, मंदोर दादा नाईक, डॉ. राजेंद्र शेळके, माजी मुख्याध्यापक एस. आर. माने सर, आर. एस. परदेशी सर, माजी मुख्याध्यापिका सौ. यू. डी. शेळके मॅडम, व्ही. एम. शिरपुरे सर, स्थानिक सल्लागार समिती सदस्य सुरेश चौधरी, डॉ. देवेंद्र शेळके, मधुकर शेठ कासार, डॉ. बाळू जैन, शरद देशमुख सर, सामाजिक कार्यकर्ते शरद अण्णा सोनार, सुनील क्षीरसागर, तुषार कासार, सचिन कासार, म्हसासचे माजी सरपंच किसनराव पाटील, प्रकाश पाटील, दीपक खरे, सीमाताई जैन , मीनाक्षीताई काळे आणि पत्रकार बांधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येची अधिष्ठात्री देवी सरस्वती माता, सद्गुरू हरिप्रसाद महाराज, कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड आणि कैलासवासी अण्णासाहेब भास्कर खंडेराव गरुड यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
विद्यालयाचे प्रतिभावंत मुख्याध्यापक पी. एम. सुर्वे सर यांनी प्रास्ताविक करताना धी शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेच्या स्थापनेचा इतिहास, संस्थेची शैक्षणिक वाटचाल, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या परंपरेचा गौरव करत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीवही जोपासावी, असे आवाहन केले.
याशिवाय मुलांमधून प्रथम क्रमांक दिव्येश हिरालाल भडके, मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम क्रमांक प्रज्ञा नाना माने आणि मुलींमधून प्रथम क्रमांक मानसी समाधान काळे या विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
विद्यालयाच्या परंपरेनुसार ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मनगटी घड्याळे भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच वस्तीगृहातील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक पुस्तक संचांचे वितरण करण्यात आले.
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये, या उदात्त हेतूने गावातील दानशूर मान्यवरांच्या सहकार्याने शालेय गणवेशांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
कला क्षेत्रात विद्यालयाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थिनी रुचिता कैलास चौधरी हिने अजिंठा आर्ट सोसायटी आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तिला सोसायटीतर्फे सायकल भेट देण्यात आली. तसेच स्पर्धेतील इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील 'आदर्श विद्यार्थी' पुरस्कार चेतन दिलीप परदेशी याला प्रदान करण्यात आला. तसेच पर्यावरण मित्र पुरस्काराचेही वितरण करण्यात आले.
या प्रसंगी लोहारा पंचक्रोशीतील अनेक दानशूर मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करत रोख रकमेच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर बक्षिसे जाहीर करून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. या वेळी पिंपळगाव हरे येथून बदली झालेले api श्री महेंद्र वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना जवळपास १० हजाराचे शालेय साहित्य कार्यक्रमादरम्यान गावातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
मनोगत व्यक्त करताना कैलास चौधरी, डॉ. बाळू जैन आणि शिवाज्ञा इंटरप्राईजेसचे संचालक किरण भाऊ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी सातत्य, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर मोठे यश संपादन करावे, असा संदेश देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोपात अ. अ. पटेल सर यांनी शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास आणि संस्थेच्या प्रगतीविषयी विचार मांडले. संस्थेने गेल्या ८२ वर्षांत ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवली असून ही परंपरा पुढेही अधिक बळकट होत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बी. एन. पाटील सर यांनी केले, तर वाय. पी. वानखेडे सर यांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर. जी. बैरागी, पर्यवेक्षक व्ही. बी. पाटील, तसेच ए. डी. गायकवाड, आर. के. सुरवाडे, एन. डी. सुशीर, व्ही. टी. पाटील, एस. एस. पाटील, आर. आर. खोडपे, एस. व्ही. पाटील मॅडम, पी. एस. महाजन मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ आणि विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या गुणवंत सत्कारामुळे संस्मरणीय ठरला.




Post a Comment
0 Comments