Type Here to Get Search Results !

पहूर येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला उदंड प्रतिसाद संत सावता महाराज व संत नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजन; ११ ऑगस्ट रोजी काल्याच्या कीर्तनाने सांगता


दिशा लाईव्ह न्यूज -:- पहूर प्रतिनिधी,, ता. जामनेर :-:  महान कर्मयोगी संत सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पहूर येथील महात्मा फुले माळी समाज मंगल कार्यालयात अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दररोज मोठ्या संख्येने भाविक कीर्तन व हरिनाम संकीर्तनाचा लाभ घेत आहेत.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही संत सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या धार्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान विविध नामवंत कीर्तनकारांच्या माध्यमातून संतविचार, अध्यात्म, भक्ती, सामाजिक प्रबोधन आणि नैतिक मूल्यांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचविला जात आहे.

सप्ताहात ह.भ.प. सुनील महाराज नशिराबाद, ह.भ.प. कैलास महाराज टेकवाडे, ह.भ.प. कोमल महाराज खेडी-भोकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, ह.भ.प. योगेश महाराज चिंचोलीकर, ह.भ.प. दत्ता महाराज देवळीकर तसेच ह.भ.प. पारस महाराज जैन बनोटी यांच्या कीर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या रसाळ वाणीतून संतांचे जीवनकार्य, अभंग, अध्यात्मिक विचार आणि सामाजिक संदेश भाविकांना ऐकायला मिळत आहे.

दि. ११ ऑगस्ट रोजी ह.भ.प. स्वप्निल महाराज माळी लोहारेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताहाच्या निमित्ताने पहूर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भजन, हरिनाम संकीर्तन व कीर्तनामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षत्रिय माळी समाज संघटनेचे पदाधिकारी, समाजबांधव, भजनी मंडळे, ग्रामस्थ तसेच भाविक परिश्रम घेत आहेत. परिसरातील अधिकाधिक भाविकांनी या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments