दिशा लाईव्ह न्यूज -:-- : येथील प्रतिष्ठित व्यापारी मे. श्रीराम हिरालाल झंवर या फर्मचे संचालक दिलीप झंवर, राजेंद्र झंवर व किशोर झंवर यांच्या मातोश्री कै. इंदुमती श्रीराम झंवर (वय ८८) यांचे आज शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने झंवर परिवारावर तसेच आप्तेष्ट, नातेवाईक व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
कै. इंदुमती झंवर या प्रेमळ, मनमिळावू व धार्मिक वृत्तीच्या म्हणून परिचित होत्या. कुटुंबातील सर्वांना प्रेमाने सोबत घेऊन त्यांनी आपल्या संसाराची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या निधनाने झंवर परिवाराने आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व प्रेमळ व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
त्यांची अंत्ययात्रा शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सोयगाव येथील राहत्या घरून निघणार असून, त्यांच्यावर सोयगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कै. इंदुमती झंवर यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे व मोठा आप्त परिवार असा परिवार आहे.
या दुःखद प्रसंगी झंवर परिवाराच्या दुःखात ‘दिशा लाईव्ह न्यूज’ परिवार सहभागी असून, कै. इंदुमती झंवर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
शोकाकुल :
दिलीप श्रीराम झंवर
राजेंद्र श्रीराम झंवर
किशोर श्रीराम झंवर
तथा समस्त झंवर परिवार.

Post a Comment
0 Comments