Type Here to Get Search Results !

पाचोरा येथील श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाजाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त तहसीलदार श्री भोलाआप्पा चौधरी यांची बिनविरोध निवड,मान्यवरांकडून सत्कार!


दिशा लाईव्ह न्यूज -:---पाचोरा  येथील श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाजाच्या पाचोरा  अध्यक्षपदी सेवानिवृत्त तहसीलदार आदरणीय श्री.भोलाआप्पा चौधरी व उपाध्यक्ष श्री प्रकाश(जिभाऊ )चौधरी तसेच सचिव श्री नारायण चौधरी यांची बिनविरोध व एकमुखी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे समाजबांधवांनी उत्स्फूर्त स्वागत केले असून, संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

         शासकीय सेवेत असतानाही अविरत समाजसेवा

श्री. भोलाआप्पा चौधरी यांनी प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना शासकीय कर्तव्यांसोबतच समाजसेवेलाही प्राधान्य दिले. समाजातील वंचित, गरजू आणि सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध स्तरांवर उल्लेखनीय कार्य केले आहे.



शासकीय सेवेचा व्याप सांभाळत जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवरील विविध सामाजिक जबाबदाऱ्या त्यांनी न्याय्य, पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडल्या. त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव, दातृत्व, दूरदृष्टी आणि नेतृत्वगुण यामुळे समाजबांधवांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत अध्यक्षपदाची जबाबदारी एकमुखाने सोपविली आहे.

                 मान्यवरांच्या उपस्थितीत हृद्य सत्कार

नवनियुक्त अध्यक्ष श्री. भोलाआप्पा चौधरी यांच्या निवासस्थानी राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देत त्यांचा सत्कार केला. यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.


             सत्कार करणाऱ्या मान्यवरांमध्ये प्रामुख्याने


- जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री पदम बापू पाटील

- शिवसेना तालुका प्रमुख श्री.राजेंद्र पाटील

- शिवसेना तालुका प्रमुख श्री.विनोद तावडे

- महाराष्ट्र राज्य महावितरण तांत्रिक कामगार संघटनेचे सचिव श्री.आर. आर.पाटील साहेब

-  श्री.हेमंत चौधरी 

- श्री. पी. एन.बापू चौधरी

- मुन्ना डॉक्टर, सरपंच,मोहाडी 

- श्री. धनराज पाटील (तारखेडा)

- श्री. एम.डी.पाटील


यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या सत्कार सोहळ्याला कौटुंबिक जिव्हाळा आणि आदराची अनोखी उंची लाभली. श्री. भोलाआप्पा चौधरी यांच्या बिनविरोध निवडीमुळे पाचोरा परिसरातील समाजात नव्या ऊर्जेचा संचार झाला असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाज संघटन, सामाजिक एकोपा आणि प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवर व समाजबांधवांनी व्यक्त केला.



Post a Comment

0 Comments