दिशा लाईव्ह न्यूज :-- : बाहेरपुरा येथील मानाच्या गणपती बाप्पाचे यंदाचे आगमन अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय वातावरणात संपन्न झाले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि गणेशभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
आमदार किशोर आप्पा पाटील यांचे समर्थक तसेच बाहेरपुराची आन-बान-शान म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक छोटू भाऊ चौधरी आणि नगरसेवक छोटू भाऊ गोहिल यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वातून या भव्य गणेश आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गणरायावरील श्रद्धा आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून सोहळ्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी पुष्पा आणि शेखावत साहेब यांच्या दमदार एन्ट्रीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांचा निनाद, आकर्षक सजावट, पुष्पवृष्टी आणि गणेशभक्तांचा उत्साह यामुळे बाहेरपुरासह पाचोरा शहरातील वातावरण गणेशमय झाले होते.
या मंगल प्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील, उपनगराध्यक्ष किशोर आप्पा बारवकर, नगरपालिका गटनेते सुमित दादा पाटील, नगरसेवक तथा शहरप्रमुख सुमित सावंत यांच्यासह बाहेरपुरातील नगरसेवक छोटू भाऊ चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली. सोहळा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
गणरायाच्या आगमनाने बाहेरपुरातील नागरिक आणि गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, “बाहेरपुरा, पाचोरा आणि संपूर्ण तालुक्यावर गणरायाची सदैव कृपादृष्टी राहो,” अशी भावपूर्ण प्रार्थना यावेळी करण्यात आली.

Post a Comment
0 Comments