Type Here to Get Search Results !

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटीची दुकाने सजली गणेशमूर्तींसह सजावटीच्या साहित्याला मागणी; बालगोपालांसह तरुणाईची बाजारपेठेत गर्दी दीड महिन्यापासून पावसाची दडी, मजुरांच्या हाताला काम नाही; अपेक्षित उत्साहाअभावी व्यापारी हवालदिल..आर्थिक अडचणी असल्या तरी बाप्पाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज; मंडळांच्या तयारीला वेग



दिशा लाईव्ह न्यूज :-:   गणेशोत्सवाला अवघे एकदिवस शिल्लक राहिल्याने लोहारा शहरातील बाजारपेठ हळूहळू गणेशमय होऊ लागली आहे. गणेशमूर्तींसह आकर्षक सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले असून, दुकानेही रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा, तोरणे, पडदे, मखर व विविध सजावटीच्या साहित्याने सजली आहेत. मात्र, दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत दिसणारा उत्साह यंदा काहीसा कमी जाणवत असून, ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थितीचा परिणाम गणेशोत्सवाच्या खरेदीवरही जाणवत असल्याचे चित्र आहे.


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत गणेशमूर्ती, विविध आकारांचे मखर, रंगीबेरंगी फुलांच्या माळा, कृत्रिम फुले, आकर्षक पडदे, तोरणे, विद्युत रोषणाई, एलईडी लाईट्स, सजावटीच्या वस्तू तसेच घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी लागणारे विविध साहित्य उपलब्ध झाले आहे. नागरिकांकडून आपल्या आवडीनुसार साहित्याची खरेदी सुरू झाली आहे.


पावसाने दडी मारल्याने ग्रामीण अर्थकारणावर परिणाम


यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पावसाअभावी शेतीची कामेही अपेक्षित प्रमाणात सुरू नसल्याने अनेक मजुरांच्या हाताला नियमित काम मिळत नाही. परिणामी रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आह

Post a Comment

0 Comments