Type Here to Get Search Results !

शेततळ्यात बुडून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू पहूर येथील दुर्दैवी घटना; परिसरात हळहळ


दिशा लाईव्ह न्यूज  --::---पहूर, ता. जामनेर येथील शेततळ्यात बुडून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. १) सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अमृत त्र्यंबक वानखेडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृत वानखेडे हे रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. याचदरम्यान शेततळ्यातील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही बाब निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी दोरांच्या साहाय्याने अथक प्रयत्न करून त्यांचा मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढला.

त्यानंतर मृतदेह पहूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण पाटील यांनी शवविच्छेदन केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेचा पुढील तपास राहुल पाटील करीत आहेत. शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments