Type Here to Get Search Results !

उद्या विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पीएम मोदींसोबत असणार अंबानी, अदानी आणि....ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मालर्स.



भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक 2023 चा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर जाणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींसोबत ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स देखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) पंतप्रधान मोदींचे सामना पाहण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींशिवाय उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानीही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगण देखील अंतिम सामना पाहण्यासाठी येण्याची शक्यता आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. याआधी भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला पराभूत करून 2011 चा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.

आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल यापूर्वी 2003 मध्ये झाली होती, परंतु भारतीय संघ हा सामना हरला होता. अशा परिस्थितीत 20 वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफीसाठी भिडणार आहेत.

Post a Comment

0 Comments