Type Here to Get Search Results !

द-बर्निग बस--रावेर /पुणे खाजगी प्रवासी बसला आग . सर्व प्रवासी सुरक्षित,बस जळून खाक!!

 



 सावदा- रावेर ते पुणे मोठ्या संख्येने खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांची वाहतूक करत असतात काल संध्याकाळी रावेर येथून पुण्याकडे निघालेली साई सिद्धी ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन जात असताना वडगाव वाघोदा दरम्यान अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली लागलीच प्रवाशी खाली उतरल्याने पुढील अनर्थ टळला.

रावेर ,सावदा नगरपालिकेतर्फे कर्मचारी अग्निशमन दलाची गाडी घेऊन आग विझवण्यात यशस्वी ठरले असून पुढील अनर्थ टळला आहे .या आगीत ही खाजगी ट्रॅव्हल्स बस मात्र पूर्ण जळून खाक झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यावेळी या ट्रॅव्हल्स ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आप आपले नातेवाईकांना घेण्यासाठी नातेवाईकांनी गर्दी केली होती.आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Post a Comment

0 Comments