Type Here to Get Search Results !

जामनेर तालुक्यातील सामरोद येथील तरुण शेतकर्याची कर्जामुळे गळफास घेऊन आत्महत्या





जामनेर -:-- गेल्या दोन वर्षांपासून निसर्ग शेतकऱ्यांना चांगलीच हुलकावणी देत आहे..तर कधी राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतांना दिसत आहे. मागील वर्षाची कपाशी (कापूस ) अजूनही भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.

या अश्या अनेक संकटांनी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

अशीच ही घटना जामनेर तालुक्यातील सामरोद या गावात घडली आहे.सततची नापिकी, अवकाळी पाऊस, शेतीच्या मालाला योग्य भाव नसल्याने मायक्रो फायन्स बॅंकेचे कर्ज कसे फेडले जाईल? या विवंचनेतून जामनेर तालुक्यातील सामरोद येथील तरुण  शेतकऱ्याने आज (ता.24) च्या रात्रीच्या दरम्यान घराच्या छताला सुती दोराने गळफास घेऊन जिवन यात्रा संपविली आहे. गजानन कडू देसाई (वय ४०) या तरुण शेतकऱ्याचे  कर्जाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली आहे.

“अवकाळी पाऊस, नापिकी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्याने रात्रीच्या दरम्यान सुमारास त्यांच्या राहत्या घरी सुती दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली.त्याला खासगी रुग्णवाहिकेने जामनेर उपजिल्हा रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षल चांदा.यांनी मृत घोषित केले.

त्यांच्यावर आज संध्याकाळी ०६:३०वाजेच्या सुमारास अत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पश्चात आई ,वडील, दोन भाऊ ,पत्नी व एक मुलगा,मुली असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments